आवेश तांदळे, मुंबई
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या रामावरील वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 'राम शाकाहारी नसून मांसाहारी होता, असं म्हटल्याने त्यांच्यावर चौफेर बाजूंनी टीका होत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही जितेंद्र आव्हाडांना टोला लगावला आहे. (Latest Marathi News)
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील विविध प्रश्नावर भाष्य केलं. तसेच जितेंद्र आव्हाडांच्या २०१९ साली अजित पवारांना उपमुख्यमंत्री करून चूक केल्याच्या वक्तव्यावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सुनिल तटकरे म्हणाले, 'अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर सरकार पहिल्याच दिवशी पडले असते. त्यावेळी गुपित मतदान झाले असते, तर त्यावेळीच भाजप आणि अजित पवारांनी सत्ता स्थापन केली असती. अजित पवार यांचे सामर्थ्य पाहून ४३ आमदारांनी पाठिंबा दिला आहे'. दिलेल काम मी करतोय.." अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरील वक्तव्यावरही तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. 'जितेंद्र आव्हाड हे मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीवर मी बोलणं योग्य नाही, असा टोला सुनिल तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
अजित पवार गटातीत नेते, कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशावर तटकरे म्हणाले, 'आज दिवसभर देवगिरी बंगल्यावर बैठक आणि पक्षप्रवेश झाले. अजित पवार यांना सामान्य लोकांचे बळ मिळत आहे. महिन्याभरात ४ कार्यक्रम आहेत. मेळावे आहेत. १३ तारखेला परभणीत युवक राष्ट्रवादी मेळावा होणार आहे. १४ तारखेला महायुतीचे मेळावे होणार आहेत. ५ जानेवारीला महायुती सर्व घटक पक्षाची बैठक होणार आहे'.
काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरील वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 'जितेंद्र आव्हाड यांचं श्रीरामाबद्दलचं विधान अत्यंत मूर्खपणाचं आहे. श्रीरामांनी फळं, कंदमुळे खाऊन १४ वर्षांचा वनवास भोगला आहे. तसा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे. देशातील वातावरण राममय झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतोय, तसाच त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, अशी टीका महंत सुधीर दास यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.