कॅनडामध्ये हेलिकॉप्टर कोसळून चार जणांचा मृत्यू
मॉन्ट्रियलजवळ हेलिकॉप्टरला अपघात
उड्डाणानंतर काही वेळात हेलिकॉप्टर कोसळले
मॉन्ट्रियलच्या आग्नेय दिशेला ही घटना घडली
कॅनडामध्ये हेलिकॉप्टरला भयंकर अपघात झाला. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मॉन्ट्रियलजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. विमान कोसळण्यापूर्वी हवेमध्येच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. या अपघाताामागचं कारण शोधले जात आहे. अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. यामध्ये होरपळूनच चौघांचा मृत्यू झाला.अग्निशमन दलाने एका तासाच्या आत आगीवर नियंत्रण मिळवले. हे हेलिकॉप्टर एका खासगी विमान कंपनीचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील मॉन्ट्रियलच्या आग्नेय दिशेला शनिवारी हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्टच्या सर्व चार जणांचा मृत्यू झाला. क्यूबेक प्रांतीय पोलिसांनी सांगितले की, मॉन्ट्रियलच्या आग्नेय दिशेला सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट-ब्रिज्ड-डी'इबरविल परिसरात दुपारी २:३० च्या सुमारास हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर भीषण आग लागली. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी त्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या.
पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, अपघातानंतर एका तासाच्या आत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले होते. हेलिकॉप्टरमधील चारही जणांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले होते. प्रांतीय पोलिसांनी अद्याप मृतांची ओळख पटवलेली नाही. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. हे हेलिकॉप्टर एका खाजगी विमान कंपनीचे असल्याचे सांगितले जात आहे. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघातस्थळी तपास करण्यासाठी टीम पाठवली आहे.
याआधी अमेरिकेत देखील हेलिकॉप्टर कोसळले होते. अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये लागलेली वणवा विझवण्यासाठी पाणी टाकत असताना दोन हेलिकॉप्टर कोसळले . या घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. हेलिकॉप्टरमध्ये फक्त पायलट होते आणि ते 'प्रिसिजन' नावाच्या कंत्राटी विमान कंपनीसाठी काम करत होते. या अपघातामध्ये मृत्यू झालेले पायलट ग्रेग किंग होते जे 'प्रिसिजन'मध्ये कामासाठी रुजू होण्यापूर्वी अलास्का वन आणि अग्निशमन विभागासाठी काम करत होते. त्यांनी राज्यात अनेक वणवे विझवण्याच्या कामात सहभाग घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.