Ramayana collection : भारतात 1००० कोटींची कमाई करणारा बॉलिवूडचा दुसरा चित्रपट; बॉक्स ऑफिसवर २३ व्या दिवशी किती जमवला गल्ला?

Ramayana box office collection day 23 : रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाने भारतात १००० कोटींची ऐतिहासिक कमाई करत बॉलिवूडमध्ये नवा विक्रम केला आहे.
Ramayana Box Office Day 23_ Epic Becomes Only the Second Hindi Film to Net ₹1000 Crore in India
Ramayana Box Office Day 23_ Epic Becomes Only the Second Hindi Film to Net ₹1000 Crore in Indiasaam tv
Published On: 

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनानंतर २३ दिवस उलटले तरी चित्रपटाची कमाई सुरूच आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने भारतात १ हजार कोटी रुपयांच्या नेट कमाईचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा 'धुरंधर २'नंतरचा हा दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटाने देशांतर्गत तसेच जागतिक बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.

२३ व्या दिवशी किती केली कमाई?

'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार,'रामायण'ने प्रदर्शनाच्या २३ व्या दिवशी भारतात ८.४५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. यासह चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन १ हजार कोटी ५५ लाख रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शन १ हजार १९५.१० कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यात ५६४.६० कोटी रुपयांची कमाई झाली होती. दुसऱ्या आठवड्यात २९९.१५ कोटी, तर तिसऱ्या आठवड्यात १२८.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई सुरूच आहे.

Ramayana Box Office Day 23_ Epic Becomes Only the Second Hindi Film to Net ₹1000 Crore in India
Eetha : रंगमंचावरच दिला बाळाला जन्म, दगडाने कापली नाळ! कोण होत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई?

'धुरंधर २'नंतर हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

भारतीय बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नेट कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आता 'रामायण'चा समावेश झाला आहे. यापूर्वी रणवीर सिंहच्या 'धुरंधर २ : द रिव्हेंज' या चित्रपटाने हा विक्रम केला होता. 'धुरंधर २'ने प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशीच भारतात १ हजार कोटींचा नेट कमाईचा टप्पा पार केला होता. तर 'रामायण'ला हा टप्पा गाठण्यासाठी २३ दिवस लागले.

जगभरातही चित्रपटाची दमदार कमाई

केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही 'रामायण'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे जगभरातील ग्रॉस कलेक्शन १ हजार ७९०.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीतही 'रामायण'ने आपले स्थान मजबूत केले आहे.

Ramayana Box Office Day 23_ Epic Becomes Only the Second Hindi Film to Net ₹1000 Crore in India
Shah Rukh Khan King Movie: शाहरुख खान-करीना कपूरचा १५ वर्षांनंतर कमबॅक; 'किंग'मधील 'डॅडी कूल' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटात कोणत्या कलाकारांच्या भूमिका?

नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची, साई पल्लवीने सीतेची, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. याशिवाय रवी दुबे लक्ष्मणाच्या, तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहेत. दोन भागांमध्ये साकारल्या जाणाऱ्या या भव्य चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. चित्रपटाचा दुसरा भाग दिवाळी २०२८ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.