Shah Rukh Khan King Movie: शाहरुख खान-करीना कपूरचा १५ वर्षांनंतर कमबॅक; 'किंग'मधील 'डॅडी कूल' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख खानच्या किंग चित्रपटातील डॅडी कूल गाणं रिलीज झालं आहे. १५ वर्षांनंतर शाहरुख आणि करीना कपूरची जोडी पुन्हा एकत्र आली असून चाहत्यांमध्ये गाण्याची चर्चा रंगली आहे.
Shah Rukh Khan King Movie
Shah Rukh Khan King MovieSaam Tv
Published On: 

Shah Rukh Khan King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'किंग' (King) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील दुसरे गाणे 'डॅडी कूल' (Daddy Cool) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मुंबईत आयोजित एका विशेष इन्स्टाग्राम इव्हेंटमध्ये या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी शाहरुख आणि करीना एकत्र उपस्थित होते. तब्बल १५ वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा चर्चेत

'डॅडी कूल' या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी शाहरुख खान आणि करीना कपूर खान एकत्र आले होते. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांची आठवण झाली. शाहरुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हे गाणे शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. 'बेबोसोबत पुन्हा एकदा... ओल्ड स्कूल गाणं, पण तरीही कूल आहे! डॅडी कूल', अशा शब्दांत त्याने गाण्याची ओळख करून दिली.

Shah Rukh Khan King Movie
Director Death: चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे अकाली निधन, चित्रपटसृष्टीला मोठा धक्का

अरिजित सिंग आणि शिल्पा रावचा आवाज

'डॅडी कूल' या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिले आहे. कुमार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर लोकप्रिय गायक अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. या डान्स नंबरचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी केले आहे. गाण्यात शाहरुख आणि करीनाचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळत आहे.

Shah Rukh Khan King Movie
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

१५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांची जोडी याआधी २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रा.वन' चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील 'चम्मक छल्लो' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. आता 'किंग' चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे 'डॅडी कूल' गाण्याची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे.

२४ डिसेंबरला 'किंग' चित्रपट होणार प्रदर्शित

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग' हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अर्शद वारसी आणि राघव जुयाल यांसारखे कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटातून शाहरुख आणि सुहाना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी तिने झोया अख्तरत्या द आर्चीज या चित्रपटात झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.