केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार
रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्वाची अपडेट
मोदी मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. एनडीए सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत दिले. त्यांनी सांगितले की, आंदोलनांमुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही पण तो लवकरच होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची माहिती देताना सांगितले की, 'आगामी मंत्रिमंडळ विस्तार सुरुवातीला हिवाळी अधिवेशनापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या सुरू असलेले आंदोलन पाहता मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल की नाही हे मला माहीत नाही. पण लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते आणि सर्व जातींना त्यात स्थान मिळू शकेल.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात नुकताच संवाद झाला. शरद पवार यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीएम मोदींनी शरद पवारांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत त्यांनी सांगितले की, 'मोदींचे शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. राजकारण बाजूला ठेवून नरेंद्र मोदी वैयक्तिक पातळीवर त्यांचा आदर करतात. ते त्यांना आपले नेतेही मानतात. आम्ही अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे.'
शरद पवार यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हणूनच पीएम मोदी यांनी त्यांना फोन करून विचारणा केली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवार एनडीएमध्ये यायला तयार नाहीत. अजित पवार एनडीएमध्ये आले पण शरद पवार आले नाहीत. जर शरद पवार आले असते तर त्यांचे भव्य स्वागत झाले असते. शरद पवारांची भूमिका आहे की, ते एनडीएमध्ये सहभागी होणार नाहीत. ते महाराष्ट्रातील महायुतीतही येणार नाहीत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.