

आयआरसीटीसी (IRCTC) माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. त्यांनी IRCTC घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून आरोप निश्चितीच्या दिलेल्या आदेशाला याचिकांद्वारे आव्हान दिले होते. न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावतानाच, आरोप निश्चितीचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणात अन्य आरोपींच्या याचिकाही कोर्टानं फेटाळल्या आहेत.
राऊज एव्हेन्यूच्या विशेष कोर्टानं १३ ऑक्टोबर २०२५ रोजी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्यांसह एकूण १४ आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. या सर्व आरोपींवर फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप करण्यात आले होते. याशिवाय भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत अनेक कलमान्वये आरोप निश्चित केले होते. रेल्वेच्या रांची आणि पुरी येथील हॉटेलांच्या निविदा आणि जमिनींच्या व्यवहारात अनियमितता झाली होती, असा आरोप सीबीआयकडून करण्यात आला होता. आता राऊज एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणात सुनावणी सुरूच राहणार आहे.
याआधी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने आयआरसीटीसी मनी लाँड्रिंग प्रकरणात लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राबडी देवी यांच्यासह एकूण ९ आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित केले होते. याशिवाय इतर आरोपींवरही आरोप निश्चितीचे आदेश दिले होते. तर इतर सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. या प्रकरणात लालू प्रसाद यांची भूमिकाही संशयास्पद आहे, असे कोर्टाचे म्हणणे होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.