Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra cabinet reshuffle latest news : सुनेत्रा पवार यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांपैकी ५ मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणाला संधी मिळणार आणि कोणाचे मंत्रिपद जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Maharashtra cabinet reshuffle latest news
Maharashtra cabinet reshuffle latest news
Published On: 

साक्षी यादव, मुंबई प्रतिनिधी

Maharashtra cabinet reshuffle latest news :महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) लवकरच मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. यावेळी कोअर कमिटीतील नेत्यांचाही समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणा संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती. या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी, गुरुवारी पुन्हा एकदा अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या सलग बैठकांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Maharashtra cabinet reshuffle latest news
४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होणार बदल?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्याबाबत गांभीर्याने चर्चा झाल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण ९ मंत्र्यांपैकी तब्बल ५ मंत्र्यांचे पत्ते कट होऊन नवीन चेहऱ्यांना किंवा काही माजी मंत्र्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra cabinet reshuffle latest news
१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

कोणाला मिळणार संधी?

पक्षातील या संभाव्य फेरबदलांमध्ये जुन्या-माजी मंत्र्यांचे पुनर्वसन केले जाणार की पक्षांतर्गत नवीन चेहऱ्यांना संधी मिळून मोठी भाकरी फिरवली जाणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय कोणत्या ५ मंत्र्यांचा पत्ता कट होणार? याचीही राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com