Four killed in bus accident while returning from Dev Darshan : देवदर्शनाहून येताना ४७ प्रवाशांनी भरलेली बस आणि टँकरची जोरात धडक झाली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की एका प्रवाशाचा पाय तुटलाय तर दोन प्रवाशांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जैसलमेर महामार्गावरील मुलानाडा रॉयल्टी चेकपॉईंटजवळ ट्रक आणि बचसा हा अपघात मंगळवारी रात्री झाल्याचे समजतेय. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटानस्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
मंगळवारी संध्याकाळी जैसलमेर महामार्गावरील मुलानाडा रॉयल्टी चेकपॉईंटजवळ टँकरने प्रवासी खासगी बसला जोरात टक्कर दिली. या बसमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जातेय. या अपघातात एका तरुणाला आपला पाय गमवावा लागला. बसमधील प्रवाशी हे देवदर्शनानंतर घराकडे परत निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. जखमींची प्रकृती पाहाता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरातमधील अरवली आणि साबरकांठा येथील यात्रेकरूंनी भरलेली एक खासगी बस रामदेवरा येथील बाबा रामदेव मंदिराचे दर्शन घेऊन येत होती . बसमध्ये महिला आणि मुलांसह ४७ प्रवासी होते. मंगळवारी दुपारी ४:३० च्या सुमारास बस मुलानाडा रॉयल्टी चेकपॉईंटजवळ आली तेव्हा समोरून वेगात आलेल्या टँकर एका मोटारसायकलला धडकला आणि नंतर बसला धडकला. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चुराडा झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबत बचावपथकही पोहचले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी मथुरादास माथुर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रावल विनू (५०), सुरेश (३६) आणि अरावली परिसरातील मोडासाचे रहिवासी जयेश आणि विनू यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या अपघातात सरदारपुरा येथील प्रवीण मंगल प्रजापत हे मोटारसायकल चालवत होते. त्यांचा पाय कापण्यात आला आणि त्यांना एम्समध्ये नेण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.