Supreme Court  Saamtv
देश विदेश

Note For Vote: सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! सभागृहात पैसे घेऊन मतदान केल्यास सुटका नाही; लोकप्रतिनिधींविरोधात चालणार खटले

No Immunity To MLA MPs In Bribe-For-Vote Cases: याआधी लाच घेऊन मतदान करणाऱ्या खासदार किंवा आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असा निकाल १९९८ मध्ये देण्यात आला होता. हाच निकाल आता सुप्रीम कोर्टाने फिरवला आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. ४ मार्च २०२४

Supreme Court News:

सभागृहात मतदान करण्यासाठी लाच घेऊन खासदार किंवा आमदार खटल्यातून सुटू शकत नाहीत, असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याआधी लाच घेऊन मतदान करणाऱ्या खासदार किंवा आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असा निकाल १९९८ मध्ये देण्यात आला होता. हाच निकाल आता सुप्रीम कोर्टाने फिरवला आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय बदलला आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल?

संसदेत किंवा विधानसभेत भाषण करण्यासाठी किंवा मतदान करण्यासाठी लाच घेतल्याबद्दल खासदार आणि आमदार यापुढे कायदेशीर संरक्षण मिळणार का?यासंदर्भात दाखल याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने 1998 चा नरसिंह राव निकाल रद्द केला आणि खासदार आणि आमदारांना कायदेशीर संरक्षण देण्यास नकार दिला आहे.

लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण नाही..

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना खासदार किंवा आमदार सभागृहात मतदानासाठी लाच घेऊन खटल्यातून सुटू शकत नसल्याचे सांगितले आहे. याआधी 1998 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3:2 च्या बहुमताने निर्णय देताना अशा प्रकरणात लोकप्रतिनिधींवर खटला चालवता येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता हाच निकाल सुप्रीम कोर्टाने बदलला आहे.

य एकमताने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात, CJI चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विधिमंडळाच्या सदस्याने केलेला भ्रष्टाचार किंवा लाचखोरी सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा भंग करते. लाचखोरीला कोणत्याही संसदीय विशेषाधिकाराचे संरक्षण नाही, असे स्पष्ट केले होते. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

SCROLL FOR NEXT