सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) 50 वे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड हे त्यांच्या स्पष्ट, सडेतोड आणि रोखठोक निर्णयांसाठी ओळखले जातात. देशभरातील विविध घटनांबाबत धनंजय चंद्रचूड यांनी महत्वाचे निकाल दिले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेमधील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असताना त्यांनी दिलेला निकाल चांगलाच चर्चेत आला होता. सध्या धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या कोर्टातील निर्णयामुळे नव्हेतर त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या कारचा नंबर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
देशाचे सरन्यायाधीशांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारच कमी वेळा बातम्या ऐकायला मिळतात. ते खासगी कार्यक्रमांना, समारंभांमध्ये क्विचितच दिसतात. अलिकडेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) हे दिल्लीमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या आलिशान गाडीने आणि खास नंबर प्लेटने सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.
बिझनेस एक्झुकेटिव्ह लॉयड मॅथियास यांनी या गाडीचा फोटो पोस्ट केला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये डी. वाय. चंद्रचूड यांच्या कारचा नंबर DL1 CJI 0001 असा आहे. विशेष म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांचा इंग्रजीमधील पदनामाचा फुलफॉर्मही CJI असाच होतो. त्यांच्या या खास नंबरची सध्या माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गाडीची खासियत काय?
धनंजय चंद्रचूड यांच्याकडे मर्सिडिज E 350 ही गाडी आहे. ही कार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या नावावर नोंदणीकृत आहे. म्हणजेच सरकारने सरन्यायाधीशांना ही गाडी दिली आहे. मर्सिडिज -Benz ची E-Class E 350d AMG लाईन हे या कंपनीच्या E-क्लास लाइन-अपमधील टॉप मॉडेल आहे.
त्याची किंमत 88 लाख आहे. E 350d AMG लाइन स्वयंचलित (TC) ट्रान्समिशनमध्ये देखील उपलब्ध आहे. हे ऑब्सिडियन ब्लॅक मेटॅलिक, ग्रेफाइट ग्रे, हाय टेक सिल्व्हर मेटॅलिक आणि पोलर व्हाइट या चार रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.