PM Modi Government Dinesh Sharma Appointed Lieutenant Governor Of Andaman And Nicobar Islands Saam Tv
देश विदेश

Political News : माजी उपमुख्यमंत्र्यांची उपराज्यपाल म्हणून नियुक्ती, भाजपच्या खासदाराला केंद्राकडून जबाबदारी

BJP Dinesh Sharma Andaman Nicobar Lieutenant Governor : भाजपचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत अधिकृत घोषणा केली.

Alisha Khedekar

  • डॉ. दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांच्या उपराज्यपालपदी नियुक्ती

  • राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली

  • शर्मा यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप नेतृत्वाचे आभार मानले

  • यापूर्वी ॲडमिरल डी. के. जोशी हे अंदमान-निकोबारचे उपराज्यपाल म्हणून कार्यरत होते

अलीकडेच मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा मोठे बदल होण्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच आता माजी उपमुख्यमंत्री तसेच भाजप खासदार असलेल्या डॉ. दिनेश शर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री उशिरा यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली. याबाबत शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्रातील नेते मंडळींचे आभार मानले आहेत.

पूर्वीचे उपराज्यपाल कोण?

यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल म्हणून ॲडमिरल डी. के. जोशी काम करत होते. जोशी हे ८ ऑक्टोबर २०१७ पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, डॉ. दिनेश शर्मा हे पदभार स्वीकारतील त्या तारखेपासून ते अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल म्हणून काम पाहतील.

डॉ. शर्मा यांनी काय म्हटलं?

नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर डॉ. शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. नव्या जबाबदारीबद्दल त्यांनी ज्येष्ठ नेते, हितचिंतक, मित्र आणि नागरिकांनी दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. ही नियुक्ती केवळ एक पद किंवा जबाबदारी नसून संविधान, राष्ट्र आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी असल्याचे शर्मा यांनी म्हटले. ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद यापुढेही कायम राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोण आहेत डॉ. दिनेश शर्मा?

डॉ. दिनेश शर्मा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री राहिले असून सध्या भाजपचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. राज्यसभेतील त्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपणार होता. त्यापूर्वीच त्यांच्यावर केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालपदाची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना भौगोलिक, सामरिक आणि प्रशासकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नव्या जबाबदारीत डॉ. शर्मा यांच्यासमोर प्रशासन, विकास आणि केंद्राच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणारा चोरटा जेरबंद

कॅबिनेट मंत्र्यांचं निधन, मध्यरात्री आला हार्ट अटॅक, राजकीय वर्तुळात शोकाकूल वातावरण

Malaria : मलेरियाची लक्षणे दिसताच अजिबात करू नका दुर्लक्ष; लगेच करा 'हे' काम, नाहीतर

Bike servicing: किती किलोमीटर्सनंतर बाईकची सर्व्हिसिंग केली पाहिजे?

Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' ५ मंदिरांमध्ये पाहायला मिळतो गणेशोत्सवाचा अद्भुत नजारा, दर्शनाला नक्की जा

SCROLL FOR NEXT