Lal Krishna Advani On Ram Mandir Saam Tv
देश विदेश

Bharat Ratna: ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर; PM मोदींची घोषणा

Bharat Ratna: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे

Gangappa Pujari

LK Advani to be Conferred Bharat Ratna:

सर्वात मोठी बातमी. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपमधील दुसरे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या जडण- घडणीत लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावरुन अडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबतची घोषणा केली. तसेच लालकृष्ण अडवाणी यांचे फोन करुन अभिनंदनही केले. या घोषणेनंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी लालकृष्ण अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट..

"श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.

तसेच "तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांनी स्वतःला आमचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून ओळखले. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत," अशा भावनाही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्यात. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT