Gujarat Drugs Saam TV
देश विदेश

Breaking News: गुजरातमध्ये तब्बल 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त; अमली पदार्थांवर आढळलं पाकिस्तानचं नाव

Gujarat Drugs News: गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कच्छमधील पोरबंदर किनारपट्टीवरून तब्बल ३३०० किलो ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Satish Daud

Gujarat Drugs Case Latest News

गुजरातचा समुद्र किनारा हा देशभरात ड्रग्ज तस्करी करण्याचा जणू अड्डाच बनल्याची परिस्थिती आहे. कारण, इथं पुन्हा एकदा ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. कच्छमधील पोरबंदर किनारपट्टीवरून तब्बल ३३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. भारतीय नौदल, एनसीबी आणि गुजरात एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३०८९ किलो चरस, १६० किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २००० कोटी रुपये असल्याचं समजतंय. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जच्या पॅकेटवर पाकिस्तानचं नाव आढळून आलंय. नौदल, एनसीबी आणि एटीएसने केलेल्या या संयुक्त कारवाईत ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून गुजरात येथील समुद्राच्या सीमेवर एक अज्ञात बोट उभी होती. ही बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी बोटीत ३३०० कोटींचे ड्रग्ज आढळून आले.

नौदलाने कारवाई करत बोटीतील ५ क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले. पकडलेल्या बोटीतील ताब्यात घेतलेले ५ आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात असून आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथे नेण्यात आले आहे.

दरम्यान, हे ड्रग्ज कुठून आले आणि याचा पुरवठा नेमका कुणाला केला जाणार होता, याबाबत सध्या चौकशी केली जात आहे. तसेच या ड्रग्जशी इतर किती लोक जोडलेले आहेत. याचा शोध देखील घेतला जात आहे. जप्त केलेल्या ड्रग्जवर 'Produce of Pakistan' असे नाव लिहण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT