Brazil Balloon Fire Horror Saam tv
देश विदेश

Shocking : हॉट एअर बलूनला भीषण आग, आकाशातून थेट जमिनीवर कोसळला; ८ जणांचा मृत्यू, भयानक व्हिडिओ

terrific tragedy in Brazil : ब्राझीलमध्ये हॉट एअर बलूनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Vishal Gangurde

हॉट एअर बलूनला हवेतच भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर हॉट एअर बलून थेट जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ब्राझील देशात ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात हॉट एअर बलूनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या एअर बलूनमध्ये एकूण २१ जण होते. त्यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना सकाळच्या सुमारास घडली. सांता कॅटरिना शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हजारो लोक पर्टनासाठी येत असतात. या घटनेने पर्यटकांमध्ये एकच भीती पसरली.

ब्राझीलमधील अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी हॉट एअर बलूनला आग लागली. आग लागल्यानंतर दुर्घटनाग्रस्त बलून प्रिया ग्रांडे शहरात कोसळलं. या दुर्घटनेतून १३ जण बचावले आहेत. तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे'.

गवर्नर जोर्जिन्हो मेलो यांनी सांगितलं की, 'बचाव पथकाकडून घटनास्थळी अन्य लोकांची शोधाशोध सुरु आहे. आम्ही सर्व या घटनेने हादरलो आहोत'. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, १३ जणांचा बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

एअर बलूनला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर बलूनमधून धूर निघू लागला. त्यानंतर बलून हळूहळू जमीनीवर कोसळू लागला. सांता कॅटरिनातील अग्निशमन दलाने सांगितलं की, 'एअर बलूनमध्ये पायलटसह २१ लोक होते'.

मागच्या रविवारी साओ पाऊलो या शहरात हॉट एअर बलून कोसळला होता. त्यात एका २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तर ११ जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हॉट एअर बलूनला आग लागल्याची घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT