Fact Check : सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा सविस्तर

viral message about free scooty : सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देण्यात येणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजची पडताळणी केली. त्यावेळी दावा असत्य ठरला.
Fact Check
scooty Saam tv
Published On

विद्यार्थ्यांना आता सरकार स्कूटी देणार आहे...तेही मोफत...असा मेसेज व्हायरल होतोय...कारण, आता कॉलेज सुरू झालीयत...त्यामुळे खरंच आता विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार आहे का...? कारण, स्कूटी चालवण्यासाठी लायसन्स लागतं...आणि लायसन्ससाठी 18 वर्ष पूर्ण असायला हवं...त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे...? सरकारची अशी कोणती योजना आहे? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Fact Check
Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ऐन पावसाळ्यात मुंबईत ११ तासांचा पाणीपुरवठा बंद, कधी अन् कुठे?

व्हायरल मेसेज

पंतप्रधान फ्री स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी फ्री स्कूटी देणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार...? त्यासाठी अर्ज कुठे करायचा? हे सांगणं गरजेचं आहे...आमच्या टीमने सरकारकडून माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Fact Check
Maharashtra Politics : शिवसेनेच्या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; दोन शिलेदार साथ सोडणार

व्हायरल सत्य काय?

विद्यार्थ्यांसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही

सरकार विद्यार्थ्यांना स्कूटी देणार हा दावा खोटा

मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका

योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये

Fact Check
Sanjay Raut : सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल,VIDEO

हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जातात. त्यामुळे लिंकवरही क्लिक करू नका, फसवणूक करणारे असे मेसेज व्हायरल करत असतात...आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com