Madhya Pradesh Assembly Election Results Saam Tv
देश विदेश

MP Election BJP Victory : मध्य प्रदेशात भाजपला मिळाली 'लाडली' बहिणींची साथ, जाणून घ्या BJP च्या विजयाची 10 मोठी कारणे

Madhya Pradesh Assembly Election Results : मध्य प्रदेशात भाजपला मिळाली 'लाडली' बहिणींची साथ, जाणून घ्या BJP च्या विजयाची 10 मोठी कारणे

Satish Kengar

BJP Won the Madhya Pradesh Assembly Elections Due to These Ten Reasons, Find Out :

मध्य प्रदेशात भाजपने बंपर विजय मिळवला आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी भाजपला 165 तर काँग्रेसला 64 जागा मिळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात निकराची लढत असल्याचा दावा एक्झिट पोलमधून केला जात होता.

मात्र भाजपचे नेते सुरुवातीपासूनच येथे बंपर विजय मिळणार असल्याचा दावा करत होते. भाजप नेत्यांच्या मते, सत्ता आणि संघटनेचा उत्तम समन्वय हे या विजयी निकालाचे प्रमुख कारण आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची महिलांसाठीची लाडली योजना असो किंवा शेतकऱ्यांसाठी व्याजमाफी योजना असो, भाजपला त्यांचा फायदा झाला आहे. यातच भाजपच्या विजयाची प्रमुख कारणे आपण जाणून घेणार आहोत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या विजयाची प्रमुख कारणे

1 पक्षाची निवडणूकपूर्व तयारी, निवडणूक प्रचारादरम्यानची कामे. अनेक पातळ्यांवर नियोजनाचे काम झाले. (Latest Marathi News)

2 प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा, राष्ट्रीय सह-संघटना सरचिटणीस शिवप्रकाश यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि परिस्थितीचा सखोल अभ्यास केला.

3 प्रचारक मंडळाने प्रत्येक लहान विषयाचे सकारात्मक नियोजन करून कार्य केलं.

4 नरेंद्र सिंह तोमर यांसारख्या बड्या नेत्यांचे निवडणूक लढवणे, ​​गृहमंत्री अमित शाह यांची संघटनात्मक बैठक, निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांची कार्यशैली महत्त्वाची ठरली.

5 केंद्र व राज्य शासनाची उत्कृष्ट कामे लोकांपर्यंत पोहोचवली.

6 बूथ विस्तार अभियानाचा उपयोग फायदेशीर ठरला. यामध्ये प्रत्येक बुथवर 15 ते 20 कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

7 पक्षाने बूथ अध्यक्ष, बूथ सचिव आणि BLO तयार करून सर्वात लहान युनिट मजबूत केल्याचा फायदा झाला.

8 2018 च्या विधानसभा निवडणुकीत जिथे भाजपचा पराभव झाला होता, तिथे विशेष प्रभारी निवडून विजय निश्चित केला.

9 फेब्रुवारी महिन्यातील रविदास महाकुंभ आणि 27 जून रोजी डिजिटल रॅलीसह मोठे कार्यक्रम फायदेशीर ठरले. राज्यभरातून काढण्यात आलेल्या समरस्त यात्रेत संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गात भारतीय जनता पक्षावर अधिक विश्वास निर्माण झाला.

10 निवडणूक जाहीरनामा बनवण्यापूर्वी, भाजपने जाहीरनामा समितीला भेट देण्याचे ठरवले, त्यानंतर लोकांना जे हवं आहे, तेच त्यात मांडण्यात आलं. ज्याचा फायदा मतांच्या रुपयाने झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT