Chhattisgarh Bjp CM Face: छत्तीसगडमध्ये BJP जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? 'या' नावांची होत आहे चर्चा

Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये सुरुवातीचे जे संकेत मिळत आहेत त्यावरून भाजपची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. अशातच राज्यात भाजप सरकार आलं, तर कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, हे जाणून घेऊ.
Chhattisgarh Election Results 2023
Chhattisgarh Election Results 2023SAAM TV
Published On

Chhattisgarh Election Results 2023: 

छत्तीसगडमध्ये भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवली. एकीकडे काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता, तर दुसरीकडे भाजपने मोदी आणि पक्षाच्या व्हिजनवर ही निवडणूक लढवत होती. केंद्रातील भाजप ज्याप्रमाणे काँग्रेसला विचारते की, त्यांचा पंतप्रधान चेहरा कोण असेल. त्याच धर्तीवर काँग्रेस छत्तीसगडमध्ये भाजपला हा प्रश्न विचारत आहे.

यातच सुरुवातीचे जे संकेत मिळत आहेत त्यावरून राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. अशातच राज्यात भाजप सरकार आलं, तर कोण मुख्यमंत्री होऊ शकतो, हे जाणून घेऊ.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhattisgarh Election Results 2023
Who Is Revanth Reddy : तेलंगणात BRSच्या सत्तेला सुरुंग लावणारे 'रेवंत रेड्डी' कोण आहेत? ठरू शकतात काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

या नावांची होत आहे चर्चा

येथे चार नावांची मोठी चर्चा आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे, माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांची नावे येतात. इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC मधील मोठ्या चेहऱ्यांमध्ये बिलासपूरचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, माजी विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक, दुर्गचे खासदार विजय बघेल, विरोधी पक्षनेते नारायण चंदेल, माजी मंत्री अजय चंद्राकर, युवा नेते ओपी चौधरी यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

असं असलं तरी राज्यात आदिवासी मुख्यमंत्र्याची मागणीही सातत्याने होत आहे. अशा परिस्थिती अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील राज्यातील बड्या चेहऱ्यांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, माजी राज्यसभा सदस्य रामविचार नेताम, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विष्णुदेव साई, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा लतादीदी यांची नावे पुढे आली आहेत.

Chhattisgarh Election Results 2023
Chhattisgarh, Telangana Assembly Election 2023 Results LIVE: तेलंगणात काँग्रेसचा १० जागांवर विजय

दरम्यान, 2018 मध्ये भाजपने डॉ. रमण सिंह यांच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी भाजपने मुख्यमंत्री कोण होईल, याची घोषणा न करता ही निवडणूक लढवली. ज्यात त्यांना यश मिळताना दिसत आहे. आज मतदान मोजणीची सुरुवात होताच, काँग्रेस आघाडीवर दिसत होती. मात्र पुढील दोन तासांत हे चित्र बदललं. आता राज्यातील 90 विधानसभा जागांपैकी 53 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com