देश विदेश

CAA: लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू होणार; 'या' सहा धर्माचे लोक बनू शकतील भारतीय नागरिक

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यास पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन मुस्लिम देशांतील गैर-मुस्लिम स्थलांतरित नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवू शकते. जे नागरिक ३१ डिसेंबर २०१४ किंवा त्यापूर्वी भारतात आले आहेत, त्यांना भारतीय नागरित्व मिळेल.

Bharat Jadhav

BJP will implement CAA :

देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी 'नागरिकत्व सुधारणा कायदा' (CAA)लागू होणार आहेत. याविषयीची माहिती केंद्र सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीय. या कायद्याबाबत अधिसूचना निवडणुकीपूर्वी जाहीर केली जाईल,असा दावा केंद्र सरकारशी संबंधित एका अधिकाऱ्याने केलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणी गृहपाठ पूर्ण केला असून सीएएचे नियम जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. (Latest News)

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यास पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन मुस्लिम देशांतील गैर-मुस्लिम स्थलांतरित नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवू शकते. या कायद्यानुसार,६ धर्माच्या (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) लोकांना भारतीय नागरीकत्व देण्यात येणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक ११ डिसेंबर २०१९ रोजी संसदेत मंजूर करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विधेयकाला अवघ्या एका दिवसानंतर राष्ट्रपतींची मंजुरी दिली त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झालं. या सीएएमुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मातील अल्पसंख्याक नागरीक जे ३१ डिसेंबर २०१४ किंवा त्यापूर्वी भारतात आले आहेत, त्यांना भारतीय नागरित्व मिळेल.

आज हाती आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सरकार हा कायदा देशात लागू करेल असं गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय. कायदा लागू झाल्यानंतर पात्र लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडच्या कलदगाव येथे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

सापांना आकर्षित करणारा वास कोणता? जाणून घ्या घरात शिरकावाचं खरं कारण

Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?

Mumbai To Amruteshwar Temple: रेल्वेने, बसने की कारने? मुंबईवरून अमृतेश्वर मंदिराला जाण्याचे सर्वोत्तम पर्याय कोणते?

दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

SCROLL FOR NEXT