Truck Drivers Strike: मोदी सरकारनं कृषी कायद्यासारखं करू नये; संपावरून ट्रक मालक संघटनेनी स्पष्ट केली भूमिका

Truck Drivers Strike: देशभरातील ट्रक चालकांच्या संपाला ट्रक मालक संघटनेनी पांठिबा दिला आहे. 'मोदी सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये, ट्रक चालकांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी ट्रक मालक संघटनेनी केली आहे.
Truck Drivers Strike
Truck Drivers StrikeSaam Digital
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली

Truck Driver Strike Update:

नव्या 'हिट अँड रन' कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून ट्रक चालकांनी हा संप पुकारला आहे. नवा 'हिट अँड रन' कायदा रद्द करण्याची मागणी ट्रक चालकांनी केली आहे. ट्रक चालकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्यभरात बैठका सुरु आहेत. देशभरातील ट्रक चालकांच्या संपाला ट्रक मालक संघटनेनी पांठिबा दिला आहे. 'मोदी सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये, ट्रक चालकांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी ट्रक मालक संघटनेनी केली आहे. (Latest Marathi News)

देशात सुरु असलेल्या ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ट्रक मालक संघटनेने पत्रकार परिषद घेतली. या संघटनेचे अध्यक्ष मलकित सिंग यांनी संपावर भूमिका स्पष्ट केली.

मलकित सिंग म्हणाले, 'आम्ही या संपाची दखल घेतली. आम्ही २७ तारखेला सर्वांना या कायद्यातील कमतरता लक्षात आणून दिल्या. गृहमंत्री, प्रधानमंत्री, मंत्री, राज्यपाल यांना लिहून आमच्या तक्रारी कळवल्या. आम्ही चालकांच्या सोबत आहोत. चालक हैं, तो मालक हैं, मालक हैं, तो चालक हैं. ट्रक चालकांचा संप देशासाठी आणि आमच्यासाठी ठीक नाही'.

Truck Drivers Strike
Petrol Diesel Crisis: राज्यभरात पेट्रोल-डिझेलचे संकट, पर्यटक अडकले; ट्रक चालकांच्या संपामुळे परिस्थिती वाईट

'ट्रक चालकांच्या मागणीवर निर्णय घ्यायला उशीर करू नका. जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती हाताबाहेर जाईल. आम्ही संयमाने काम करत आहे. आगीत तेल ओतण्याची आमची भूमिका नाही. हा कायदा रद्द करावा लागेल. देशातील अशीच स्थिती कायम राहिली तर कठीण होईल, असेही ते म्हणाले.

Truck Drivers Strike
Praniti Shinde News: 'स्वार्थासाठी हे सरकार कोणत्याही टोकाला जाईल...' आमदार प्रणिती शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा

'ट्रक चालक सोडून गेले तर परत आणणे कठीण असेल. सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. सरकारने तातडीने कायदे रद्द करण्याची घोषणा करावी. आज संध्याकळपर्यंत यावर उपाय शोधला जाईल, अशी आम्हाला आशा आहे. सरकारने कृषी कायद्यासारखे करू नये. या प्रकरणात जास्त वेळ वाया घालवू नका, असे मलकित सिंग म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com