Praniti Shinde News: 'स्वार्थासाठी हे सरकार कोणत्याही टोकाला जाईल...' आमदार प्रणिती शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा

Praniti Shinde News: कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून स्वार्थासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल.. अशी टीका त्यांनी केली आहे.
Praniti Shinde News:
Praniti Shinde News:Saamtv
Published On

Maharashtra Politics News:

सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातून गुजरातला जाणारे प्रकल्प, वाढती गुन्हेगारी यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून स्वार्थासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल.. अशी टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्यात प्रणिती शिंदे?

पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. सर्वप्रथम त्यांनी सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांवरुन सरकारवर निशाणा साधला. "राज्यातून अनेक प्रकल्प गुजरात सह अन्य राज्यांमध्ये जात आहेत. महाराष्ट्रचं दुसऱ्या राज्याला देऊन टाकतील अशा पद्धतीने सरकारचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारवर हल्लाबोल...

तसेच यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. "महिला कुस्तीपटूंवर अन्याय होत असताना ब्रिजभुषण सिंगवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. इंडिया गाडीतील खासदारांनी फक्त प्रश्न विचारला तर त्यांना निलंबित केले. यापेक्षा लोकशाहीला धोका काय असू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारला गोरगरिबांचा देणंघेणं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हे कोणत्याही टोकाला जाईल.." असेही त्या म्हणाल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Praniti Shinde News:
Nanded News : रस्ते जाम असल्याने एसटीच्या ८० फेऱ्या रद्द; इंधन साठा मुबलक असल्याचा दावा

नाना पटोलेंचीही टीका..

दरम्यान, पाणबुडी प्रकल्पावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला. "राज्य बकाल करायचं व राज्याला उध्वस्त करायचं हाच फॉर्मुला ह्या येड्यांच्या सरकारचा आहे. पाणबुडी प्रकल्पाबाबत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत आहेत. राज्यातील प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुजरात मध्ये गेले आहे हे नाकारता येत नाही," खोटं बोला पण रेटून बोला असा सरकारचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. (Latest Marathi News)

Praniti Shinde News:
Nanded News : रस्ते जाम असल्याने एसटीच्या ८० फेऱ्या रद्द; इंधन साठा मुबलक असल्याचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com