Viral Video: टीसीशी वाद महागात पडला! तरुणाला प्रवाशांनी धु धु धुतला; धक्कादायक VIDEO समोर

Jablapur Station Viral Video: मध्यप्रदेशातील जबलपुर रेल्वे स्थानकावरील टीसी आणि एका प्रवासी तरुणामध्ये झालेल्या तुफान मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Fighting Video
Viral Fighting VideoSaamtv
Published On

Madhya Pradesh Viral Video:

बस प्रवास, रेल्वे प्रवासात वादविवाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तिकिटावरुन कंडक्टर, टीसीसी वाद झाल्याच्या घटना अनेकदा पाहायला, ऐकायला मिळतात. अनेकदा हा किरकोळ वाद थेट हाणामारीपर्यंतही जातो. सध्या मध्यप्रदेशातील जबलपुर रेल्वे स्थानकावरील टीसी आणि एका प्रवासी तरुणामध्ये झालेल्या तुफान मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) जबलपूर रेल्वे स्थानकावर प्रवासी आणि टीसी यांच्यात मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जुनी असल्याचे सांगण्यात येत असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. टीसी तिकीट चेक करत असतानाच त्याचा एका प्रवासी तरुणासोबत वाद होतो. ज्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी होते.

टीसीवर हात उचलल्यामुळे इतर प्रवासी चांगलेच संतप्त होतात. त्यानंतर हा वाद इतका वाढतो की त्या युवकाला अन्य प्रवासी लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्या तरुणावर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Fighting Video
Lezim On Bhim Song: भिमरायांच्या गाण्यावर विद्यार्थिनींचा लेझिम खेळ; शाळेतला सुंदर VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, टीसी आणि तरुणामध्ये तिकीटावरुन वाद सुरू आहे. अचानक टीसी त्या तरुणार हात उचलतो. त्यानंतर तरुणही त्याला धक्का देतो आणि जोरदार थप्पड लगावतो. तरुणाच्या या हल्ल्याने टीसी थेट खाली पडतो. ज्यांनंतर इतर प्रवासी चांगलेच आक्रमक होतात आणि त्या तरुणाला मारहाण करतात.

दरम्यान, ही हाणामारी कशामुळे झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच आतापर्यंत या प्रकरणी कोणतीही तक्रार एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रार केल्याशिवाय आम्ही यावर कोणती कारवाई करू शकत नाही.. असे ग्रा.पं.चे पोलीस ठाणे प्रभारी शशी धुर्वे यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Viral Fighting Video
Raigad News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना फौजदारी संहितेच्या नोटीसा; शासन आपल्या दारी उपक्रमात विघ्न टाळण्यासाठी दिल्याची चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com