Raigad News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना फौजदारी संहितेच्या नोटीसा; शासन आपल्या दारी उपक्रमात विघ्न टाळण्यासाठी दिल्याची चर्चा

Raigad News : राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगडमध्ये ५ जानेवारीला नियोजित आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री रायगडमध्ये येत आहेत
Raigad News
Raigad NewsSaam tv
Published On

सचिन कदम 

रायगड : दक्षिण रायगडमधील ठाकरे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फौजदारी संहितेच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. (Mahad) महाड, माणगाव आणि पोलादपूरमधील २९ कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी या नोटीस बजावुन हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Breaking Marathi News)

Raigad News
Police suspended : थर्टी फस्टची ड्युटी सोडून मारली दांडी; कर्तव्यात कसूर करणारे सात पोलीस कर्मचारी निलंबित

राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम (Raigad) रायगडमध्ये ५ जानेवारीला नियोजित आहे. या उपक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री रायगडमध्ये येत आहेत. या कार्यक्रमाला विरोध करणार असल्याचा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांनी घेतला असल्याने हि दडपशाही असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raigad News
Sugarcane Worker Issue : ऊसतोड कामगारांच्या दरवाढीसाठी शरद पवार, पंकजा मुंडे करणार चर्चा; ४ जानेवारीला शिर्डीत होणार बैठक

म्हणूनच नोटीस 

सदर नोटीसमध्ये कायदा आणि सुव्यवस्था, समाज विघातक कृत्य घडू शकतो; अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उल्लेख करण्यात आला नसला तरी ५ जानेवारीला आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com