सुरज मासुरकर, मुंबई|ता. २ जानेवारी २०२४
सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ल्यातRa होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg) प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा जिल्ह्याच्या पर्यटन व विकासाला चालना देणारा प्रकल्प असून हा आमच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले आहे. तसेच नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती व वस्तुस्थिती मंत्री चव्हाण यांनी जाणून घेतली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसीकडे) वर्ग करण्यात आला आहे.
या प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही व सदर प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.