Rahul Gandhi Vs Ravishankar Prasad
Rahul Gandhi Vs Ravishankar Prasad  SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi Vs BJP : हरले तर लोकशाही कमकुवत आणि जिंकले तर... ; भाजपने राहुल गांधींची हिस्ट्रीच काढली!

Nandkumar Joshi

Rahul Gandhi Vs Ravishankar Prasad : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजप नेता रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. राहुल गांधींनी त्यांच्या सवयीनुसार दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या तथ्यहीन वक्तव्यांना उत्तर द्यायला आलो आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अपात्र घोषित केलेले एकमेव नेते नाहीत. तर भाजपच्या ६ नेत्यांसह एकूण ३२ नेत्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. राहुल गांधींनी बलिदान दिल्याचं काँग्रेस पक्ष भासवत आहे. तसेच कर्नाटकात त्यांना अपात्र घोषित केल्याच्या मुद्याचा फायदा उचलायचा आहे, असा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी या पत्रकार परिषदेत केला. (Latest Marathi News)

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या जुन्या वक्तव्याचा दाखला देतानाच, खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभावच आहे, असं टीकास्त्र सोडलं. भारतातील लोकशाहीचा अवमान करणे, भारतीय संस्थांचा अपमान करणे, भारताच्या जनमताला अपमानित करणे ही त्यांची सवय झालेली आहे, असेही ते म्हणाले.

मोदींजींवर ते काय काय बोलत असतात, असा टोला लगावतानाच, रविशंकर प्रसाद यांनी पुलवामा हल्ला, लोकशाही आणि चीनसंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांचा हवाला दिला. राहुल गांधी हे परदेशात जाऊन अशा प्रकारचे वक्तव्य करतच असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

२०१९ मध्ये राहुल गांधींनी जाणूनबुजून मोदी समाजाचा अपमान केलाय - प्रसाद

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये जे काही वक्तव्य केले होते, ते जाणूनबुजून केले होते. टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, पण शिवीगाळ करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी शिवीगाळ केली होती. त्यांना कोर्टातही जाण्याची संधी मिळाली. सुनावणी झाली, त्यावेळी माफी मागणार का अशी विचारणा त्यांना केली गेली. पण त्यांनी माफी मागितली नाही. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मागासवर्गीयांचा अवमान केला होता. त्यामुळं मोदी समाज दुखावला गेला, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.

कोर्टाच्या आदेशाविरुद्ध अपील का नाही केलं?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाणूनबुजून मागासवर्गीयांचा अपमान केला. त्याविरोधात भाजप देशभरात आंदोलन करणार आहे. राहुल गांधींकडे तर मोठमोठ्या वकिलांची फौज आहे. ज्येष्ठ वकील काँग्रेसच्या बाजूने आहेत. तरीही ते कोर्टात गेले नाहीत. हायकोर्टात गेले नाहीत. अपील केले नाही. कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी त्यांनी अपील का केले नाही? त्यांनी जाणूनबुजून असं केलं नाही, असेही प्रसाद यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanakalatha Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रदीर्घ आजाराने निधन; २५० हून अधिक चित्रपटांत केले होते काम

Breaking News: पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT