

पृथ्वीराज चव्हाण यांचा १९ डिसेंबरबाबत खळबळजनक दावा.
मराठी व्यक्ती पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त.
देशात राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा.
देशात नव्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगत्येय.. आणि त्याला कारण ठरलंय काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान बदलण्याबाबत केलेलं वक्तव्य. 19 डिसेंबरला मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त करुन पृथ्वीराज चव्हाणांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत.भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर कटकारस्थान रचलं जातंय.त्याला काँग्रेसची साथ असल्याचा पलटवार भाजपनं केलाय..आशिष शेलारांनी चव्हाणांचा दावा हा 2025 मधील जोक असल्याचा टोला हाणलाय.
खरंतर 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती असा विजय भाजपला मिळाला, मात्र 2024 च्या लोकसभेत भाजपची मोठी घसरण झाली आणि भाजपला केवळ 240 जागा राखता आल्या. त्यामुळे भाजपला कुबड्यांचं सरकार चालवावं लागत आहे. त्यातच आता अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन फाईल्स उघडण्यात येणार असल्यानं भारतीय पंतप्रधानांचं सिंहासन डगमगण्याची शक्यता चव्हाणांनी वर्तवली आहे. मात्र जेफ्री एपस्टाईन फाईल्स चर्चेत का आलीय. पाहूयात.
जेफ्री एपस्टाईनने 2019 पुर्वी जगभरात अनेक स्टिंग ऑपरेशन्स् केली
एपस्टाईन फाईल्सचा अहवाल सार्वजनिक करण्यास अमेरिकन संसदेनं मंजूरी दिली
एपस्टाईन फाईल्स ट्रान्स्परसी अॅक्टनुसार 19 डिसेंबरला फाईल सार्वजनिक केली जाणार
या फाईल्समध्ये जगभरातील नेते, उद्योगपती यांची टॉप सिक्रेट असल्याची माहिती
ही माहिती उघड झाल्यानंतर जगभरात खळबळ उडण्याची शक्यता
आता 19 डिसेंबर तोंडावर असताना चव्हाणांनी हा दावा केलाय. त्यामुळे जेफ्री एपस्टाईन फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर खरंच भारतात राजकीय अस्थिरता निर्माण होणार का आणि स्वातंत्र्याच्या 78 वर्षापासून सातत्यानं महाराष्ट्राला सातत्यानं हुलकावणी देणारं पंतप्रधानपद मराठी व्यक्तीला मिळणार का? याकडे देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.