Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

Mahanagarpalika Election BJP-Shiv Sena Seat-Sharing : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेना भाजपमध्ये जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. ५०-५० जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची मागणी शिंदे गटाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
Mahanagarpalika Election BJP-Shiv Sena Seat-Sharing :
Shiv Sena leader Eknath Shinde during a meeting ahead of Maharashtra municipal elections.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुका भाजप–शिवसेना महायुतीतून लढवल्या जाणार.

  • शिंदे गटाकडून ५०-५० जागावाटपाचा फॉर्म्युला मांडण्याची तयारी.

  • जागावाटपावरून शिवसेनेचा भाजपवर दबाव वाढणार

राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना महायुतीतून लढणार असल्याचं निश्चित झालंय. मात्र याचदरम्यान शिंदे गटाकडून मोठा डाव खेळण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होणार आहे. यावेळी शिंदेसेना ५०-५० फॉर्म्युला भाजपसमोर ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जागा वाटपावरून जागा वाटपावरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय.

Mahanagarpalika Election BJP-Shiv Sena Seat-Sharing :
येत्या २ महिन्यात राज्याचा CM बदलणार? महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. भाजपकडून करण्यात येणारी नेत्यांची फोडाफोडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आता दोन्ही पक्षांनी सबुराचा निर्णय घेत महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुती होणार हे जवळपास निश्चित झालं असलं तरी आता जागा वाटपावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Mahanagarpalika Election BJP-Shiv Sena Seat-Sharing :
Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसात बैठक होणार आहे. मुंबईच्या जागांसाठीही दोन दिवसांत पहिली बैठक पार पाडणार आहे. यात भाजपकडून चार तर शिवसेनेकडून सहा नेते असतील. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह असतील, त्यामुळे जागावाटपावर कोण नमती भूमिका घेणार हे औत्सुक्यचं ठरणार आहे.

Mahanagarpalika Election BJP-Shiv Sena Seat-Sharing :
शालेय पोषण आहारात १८०० कोटींचा घोटाळा, हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप

दरम्यान मुंबईत भाजपकडून १५० जागांवर लढण्यास तयारी आहे तर शिवसेना सुद्धा शंभरहून अधिक जागांवर लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. एकंदरीत जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका एकत्रितच घेतल्या जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. राज्यातील २९ महापालिका एकत्रित निवडणुका होतील. यात चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा वेळेतच होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com