EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कडक बंदोबस्त आहे. असं असताना रायगड जिल्ह्यातील पेण नगरपरिषदेच्या स्ट्राँगरुममधील दरवाजा उघडा असल्याचं आढळून आलं. मात्र हा सगळा प्रताप कुणी केलाय ?पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Visuals of the EVM strongroom in Pen, Raigad, where a rat allegedly opened the secured door, triggering panic among candidates and officials.
Visuals of the EVM strongroom in Pen, Raigad, where a rat allegedly opened the secured door, triggering panic among candidates and officials.
Published On

सीसीटीव्हीची निगराणी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि 24 तास कार्यकर्त्यांचा खडा पहारा. मात्र एवढं सगळं असतानाही ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमच्या दिशेनं धाव घेतली. मात्र हा सगळा प्रताप केलाय तो एका उंदराने.

ही दृश्य पाहा. हा उंदीर ईव्हीएमच्या स्ट्राँगरुममध्ये शिरलाय. टेबलच्या कपाटावर फिरतोय. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षेवरुन नाराजी व्यक्त केलीय. तर तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी तातडीने पेणच्या स्ट्राँगरुमला भेट दिली. आणि उंदराचा सुळसुळाट रोखण्यासाठी कारवाईचे आदेश दिलेत.

एका बाजूला देशभरात ईव्हीएम हॅकिंगवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्यानं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ईव्हीएम स्ट्राँगरुबाहेर तळ ठोकून आहेत. तीन शिफ्टमध्ये कार्यकर्ते स्ट्राँगरुमबाहेर पहारा देत आहेत. मात्र आता उंदराने स्ट्राँगरुमची सुरक्षा भेदून एक प्रकारे निवडणूक आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आणलाय. त्यामुळे लोकांचा निवडणूक आयोगावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आयोगानेच ईव्हीएमच्या सुरक्षेची काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com