

धर्मशाळेत खेळलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ७ विकेट राखत पराभव केला.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताची २-१ अशी आघाडी.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघानं 7 ७ विकेट राखत शानदार विजय मिळवलाय. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत २-१ ने आघाडी घेतलीय. भारतीय गोलंदाजांचा शानदार खेळाच्या जोरावर टीम इंडियानं या मालिकेत आघाडी घेतलीय. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ११८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी तुफान फटकेबाजीने सुरुवात केली. दरम्यान भारतीय संघाला सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. भारतीय संघाला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रुपाने मिळाला, त्याने १८ चेंडूत ३५ धावा काढल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना धर्मशाळा येथे खेळला गेलाय. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कारण भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मोठी खेळी करून दिली नाही. अख्या संघाला भारतीय गोलंदाजांनी ११७ धावांवर गारद केलं.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात हेन्ड्रिक्सला बाद केले. हेन्ड्रिक्सला त्याचे खातेही उघडता आले नाही. त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्यानंतर, चौथ्या षटकात हर्षितने आणखी एक विकेट घेतली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने फक्त १० धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, सातव्या षटकात हार्दिक पंड्याने स्टब्सला बाद करत दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला. यासह हार्दिकने टी-२० मध्ये १०० बळींचा टप्पाही गाठला.
त्यानंतर ११ व्या षटकात शिवम दुबेने दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का देत बॉसला बाद केलं. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे धावसंख्या फक्त ४४ होती. त्यानंतर १४ व्या षटकात वरुणने फरेराला बाद करत सहाव्या फलंदाजाला चालता बनवलं. त्यानंतर १६ व्या षटकात, वरुणने दक्षिण आफ्रिकेचा सातवा बळी घेतला. १९ व्या षटकात अर्शदीपने ६१ धावा काढणाऱ्या माक्रमला केले.
शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीप यादवनेही दोन विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला ११७ धावामंध्ये ऑल ऑऊट केलं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अर्शदीपने ४ षटकांत १३ धावा देत २ बळी घेतले. हर्षित राणानेही दोन विकेट्स घेतल्या. हार्दिक आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. तर वरुण आणि कुलदीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.