Rahul Gandhi Convicted: मोठी बातमी! राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; मोदी आडनावाबद्दल 'ते' वक्तव्य भोवलं

Surat District Court: राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव'वरून वादग्रस्त विधान केले होते, त्यावरुन सुरत कोर्टाने हा निर्णय दिला आहे..
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV

Surat District Court: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दलची आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत असून राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुणावली आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आहे. राहुल गांधी यांनी 'मोदी आडनाव'वरून वादग्रस्त विधान केले होते, याच प्रकरणात सुरत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Raj Thackeray News : राज ठाकरे यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांत तक्रार; प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावर भाष्य करताना मोदी हे सर्व चोरांचे नाव आहे का? असे विधान केले होते. यावरुनच मोदी आडनाव बदनामी प्रकरणी (defamation case) सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षाही स्थगित केली आहे.

Rahul Gandhi
Sanjay Raut News: 'विरोधकांना फक्त उद्धव ठाकरेंची भिती...' राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले; 'पक्षाला १८ वर्ष...'

काय आहे संपूर्ण प्रकरण...

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधींनी "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का?" असे विधान केले होते. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.

जामीन मंजूर...

यापूर्वी 17 मार्च रोजी या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणात तात्काळ राहुल गांधींना राजीनामाही मंजूर झाला आहे. सुरत कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com