Sanjay Raut News: 'विरोधकांना फक्त उद्धव ठाकरेंची भिती...' राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले; 'पक्षाला १८ वर्ष...'

MNS Padwa Melava: शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेतून राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता..
Sanjay Raut - Raj Thackeray
Sanjay Raut - Raj ThackeraySAAM TV

Sanjay Raut On Raj Thackeray Speech: काल दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर मनसेचा (MNS) गुढी पाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी जाहीर सभेतून महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंमुळेच एकनाथ शिंदेंसारखे अनेकजण शिवसेनेतून बाहेर पडले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) केलेल्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंना चोख प्रत्यूत्तर दिले आहे. "पक्षाला १८ वर्ष पुर्ण झाली आहेत, आता त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं," असा सल्लाही त्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut - Raj Thackeray
Raj Thackeray Speech: 'धन्य त्यांची हास्यजत्रा...' राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीची खोचक टीका

काय म्हणाले संजय राऊत..

याबाबत अधिक माहिती अशी की, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पाडवा मेळाव्यातील सभेतील टीकेला संजय राऊत यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. "एकनाथ शिंदे, राज ठाकरे, भाजपसह सर्वच पक्ष फक्त उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत त्यामुळेच प्रत्येकाने त्याची धास्ती घेतली असल्याचे," ते यावेळी म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेवर टीका केली. "पक्षाला १८ वर्ष पुर्ण झाली आहेत, पक्ष वयात आला आहे, ते काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्हाला आमची ताकद माहित आहे, क्षमता माहित आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला..

Sanjay Raut - Raj Thackeray
RBI Announcements : ३१ मार्चपर्यंत सलग बँका सुरू ठेवा, रिझर्व्ह बँकेचा महत्वाचा आदेश; रविवारची सुटीही रद्द

जनतेच्या प्रश्नांवर बोला...

तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी "आज प्रत्येकजण भाजपने लिहून दिलेली भाषणे वाचत आहे. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. महागाई आहे, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा मुद्द्यांवर बोलावे," असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com