RBI Announcements : ३१ मार्चपर्यंत सलग बँका सुरू ठेवा, रिझर्व्ह बँकेचा महत्वाचा आदेश; रविवारची सुटीही रद्द

Bank Opening : ३१ मार्च २०२३ पर्यंत बँका दररोज सुरू ठेवा, असे आदेश रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांच्या शाखांना दिले आहेत.
RBI Cancelled Bank Holidays
RBI Cancelled Bank HolidaysSaam TV
Published On

RBI Announcements : मार्च महिना हा आर्थिक वर्षाच्या दृष्टीकोणातून खूपच महत्वाचा मानला जातो. २०२२-२३ आर्थिक वर्ष आता अंतिम टप्प्यात आले आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालये तसेच बँकांच्या महत्वाच्या कामकाजांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे. देशातील सरकारी, निमसरकारी, खासगी, सहकारी बँका यासारख्या बँकिंग संस्था जोमाने काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आरबीआयने बँकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. (Latest Marathi News)

RBI Cancelled Bank Holidays
Weather Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा, तब्बल १५ जिल्ह्यांना अलर्ट

३१ मार्च २०२३ पर्यंत बँका दररोज सुरू ठेवा, असे आदेश रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांच्या शाखांना दिले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांत बँका (Bank) रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ या महिन्याच्या ३१ तारखेला संपणार आहे. काही महत्वाची कामे बाकी असल्याने ती झटपट आटोपण्यासाठी रिझर्व बँकेने हे आदेश दिले असल्याची माहिती आहे.

आरबीआयने (RBI) यासंदर्भातील परिपत्रक देखील काढले असून त्यात बँकांना काही सूचना करण्यात आल्या असून विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. आरबीआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, "सरकारशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा ३१ मार्च रोजी सामान्य कामकाजाच्या तासांपर्यंत खुल्या ठेवाव्या लागतील".

RBI Cancelled Bank Holidays
Ahmednagar Accident : देवदर्शनाहून घरी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, ११ जखमी

"नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच RTGS प्रणालीद्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी बँका ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतील. या काळात सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल".

त्याकरीता डिपार्टमेंट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम म्हणजेच DPSS आवश्यक निर्देश जारी करेल. DPSS हे आरबीआयच्या अंतर्गत येते. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, त्यांच्या ताटकळत पडलेली कामे ३१ मार्चच्या आत पूर्ण होईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com