Weather Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा, तब्बल १५ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
Weather Report Today
Weather Report Today Saaam TV

Maharashtra Weather Updates : गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. काही जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा देखील बसला. ऐन रब्बी हंगामाची पिके काढणीला आली असताना झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले. दरम्यान, आता पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Weather Report Today
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्याची प्रशासनाकडून गंभीर दखल; माहीमच्या समुद्रातील अनाधिकृत बांधकाम पाडणार

पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २४ तासांत राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागच्या २४ तासांत कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Weather Report Today
Ahmednagar Accident : देवदर्शनाहून घरी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, ११ जखमी

आज कोणत्या भागात पावसाची शक्यता?

आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.

दरम्यान, आज उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा जाणवत आहे. बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १३ अंशांच्या पुढे कायम आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात विजांसह वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com