ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

Mumbai Politics : ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या तेजस्विनी घोसाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता सूत्रांनी दिली.
uddhav thackeray News
uddhav thackeray Saam tv
Published On
Summary

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना हादरा बसण्याची शक्यता

तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

घोसळकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

गणेश कवडे, साम टीव्ही

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल जानेवारी महिन्यात वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अंतर्गत तयारी सुरू केली आहे. आयोगाकडून अधिकार्‍यांची नियुक्ती सुरू झाली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षाकडूनही मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी 'करो या मरो'ची असणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंनी बैठकाचा सपाटा लावला आहे. या निवडणुकीची फिल्डिंग सेट करत असताना ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील बड्या महिला नेत्या सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी मुंबईतील विविध वॉर्डात भाजपकडून बैठक आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अमित साटम हे मुंबईतील कानाकोपऱ्यात फेरफटका मारत आहेत. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल, असा दावा देखील भाजपकडून केला जात आहे. या भाजपने उद्धव ठाकरेंनाही घेरण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

uddhav thackeray News
परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

पालिका जिंकण्याचं स्वप्न बाळगणारा भाजप मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर उद्या म्हणजे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जात होतं.

uddhav thackeray News
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू

निवडणूक लढणार का?

ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक १ हा यंदा ओबीसी आरक्षित झाला. त्यामुळे घोसाळकर यांनी यंदा निवडणूक लढवू शकणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्या पालिकेच्या वॉर्ड क्रं. ७, ८ किंवा २ मधून निवडणूक लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे गटात नाराज झालेल्या तेजस्विनी घोसाळकर या यंदा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com