PM Narendra Modi On Opposition Party Saam Tv
देश विदेश

BJP Parliamentary Meeting: विरोधेकांच्या 'INDIA' वर PM मोदीची पहिली प्रतिक्रिया, ईस्ट इंडियासोबत केली तुलना

PM Narendra Modi On Opposition Parties: पीएम मोदींनी विरोधकांच्या 'इंडिया'वर (INDIA) पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सडकून टीका केली.

Priya More

Delhi News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये (Parliment Monsoon Session) मणिपूरवरुन गदारोळ सुरु आहे. याचदरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय दलाची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बोलताना पीएम मोदींनी थेट विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला. तसंच त्यांनी विरोधकांच्या 'इंडिया'वर (INDIA) पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सडकून टीका केली. त्यांनी विरोधकांच्या इंडियाची तुलना इस्ट इंडियासोबत (East India) केली आहे.

पीएम मोदींनी या बैठकीमध्ये बोलताना सांगितले की, 'विरोधी पक्षाचे काम आंदोलन करणे आहे. त्यांना आंदोलन करु द्या. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या. इंग्रज आले तेव्हा त्यांनी आपले नाव ईस्ट इंडिया कंपनी असे ठेवले होते. इंडियन मुजाहिद्दीनच्या नावामध्येही इंडिया आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनी आपले नाव 'इंडिया' ठेवले आहे.', अशी टीका पीएम मोदींनी केली आहे.

मणिपूरच्या घटनेवरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेवरुन विरोधक आक्रमक झाले असून ते संसदेत गदारोळ करत आहे. यावरुन देखील मोदींनी त्यांच्यावर टीका केली आहे. 'विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसते. विरोधी पक्ष दिशाहीन आहे. त्यांना विरोधी पक्षातच राहायचे आहे.', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

तसंच, '2027 पर्यंत भारताला विकसित देश बनवणे आणि तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे. हे आपले उद्दिष्ट आहे.', असे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरी झेंडा लावण्याच्या कार्यक्रमाबद्दल देखील माहिती दिली. देशातील प्रत्येक विधानसभेतून मातीने भरलेला अमृत कलश दिल्लीत आणून अमृतवन दिल्लीत उभारले जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.

संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी पीएम मोदींनी भाजपच्या संसदीय दलाची बैठक घेतली. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पीएम मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासोबत केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कसब्याची जनता मला पुन्हा निवडून देईल- रवींद्र धंगेकर

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT