Sanjay Raut On Shinde-Fadnavis Government: 'देवेंद्र फडणवीस मुख्य न्यायमूर्ती नाहीत, काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार', संजय राऊतांचा पुन्हा दावा

Maharashtra Government: संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत हा दावा केला आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra FadnavisSaam TV
Published On

Sanjay Raut Press Conference: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Deputy CM Devendra Fadnavis) जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा केला आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत हा दावा केला आहे. 'देवेंद्र फडणवीस मुख्य न्यायमूर्ती नाहीत, अध्यक्ष नाहीत. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार', असल्याचे मत संजय राऊतांनी व्यक्त केले आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar News: मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी अंगलट! अजित पवारांकडून समर्थक नेत्यांची खरडपट्टी, सूत्रांची माहिती

संजय राऊत यांनी सरकार पडणार असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयने काय म्हटलं हे महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस काय अध्यक्ष आहेत का? सूर्य मावाळणार आहे. काहीही निर्णय घेतला तरी हे सरकार जाणार आहे. हे सरकार 10 ऑगस्टपर्यंत जाईल.', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

तसंच, 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे मुख्य न्यायमूर्ती नाहीत. फडणवीसांच्या बोलण्याला काही अर्थ आणि तथ्य नाही. ३ महिने पूर्ण होत आहे त्यामुळे निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यांनी काहीही निर्णय घेतला हा शिंदे सरकारच्या विरोधातच जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Monsoon Session: विधीमंडळ अधिवेशनात आज टोमॅटोचा मुद्दा गाजणार, 'या' महत्वाच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची या वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग उद्या आणि दुसरा भाग २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीवर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी सांगितले की, 'उद्या मुलाखत येईल त्यापूर्वीच टीका करायला लागले. टीका करायला काही उद्योग नाही का? निधी वाटप सुरू आहे. त्यावर बोला. मुलाखत घेण्याआधीच त्याची चर्चा सुरु होते. उद्याच्या मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट होतील.'

Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Amit Thackeray Toll Break Case: टोल तोडफोड प्रकरणी भाजपा-मनसेत जुंपली; भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओला मनसेचं खरमरीत उत्तर

संसदेच्या पावसाळी अधिवशेनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नसल्यामुळे संजय राऊतांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'चर्चा करायला जोड्याने या. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सोबत यावे. ते आम्हाला चालेल. पण पंतप्रधान यांनीच बोलावं ही आमची मागणी आजही कायम आहे. मनमोहन सिंह यांना मौनीबाबा म्हणून बोलत होते. आता मात्र हे मौन धरून बसले आहेत.', अशी टीका त्यांनी केली.

यावेळी संजय राऊत यांनी असे देखील सांगितले की, 'काल परवा अण्णा हजारे यावर बोलले. अण्णांनी पंतप्रधान यांना विचारायला हवं. हवं तर अण्णा यांनी मणिपूरला जावं. आम्ही त्यांच्यासोबत मणिपूरला जाऊ.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com