Petrol Diesel Price 25 July: कच्च्या तेलाच्या किंमतीत किंचित वाढ; जाणून घ्या इंधनाचे नवीन दर

Petrol Diesel Price Today 25 july 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी वाढ झाली आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

Petrol Diesel Price in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी वाढ झाली आहे. WTI क्रूड 0.08 डॉलरने वाढून प्रति बॅरल 78.82 डॉलरवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 82.75 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

Petrol Diesel Price
Ajit Pawar News: मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी अंगलट! अजित पवारांकडून समर्थक नेत्यांची खरडपट्टी, सूत्रांची माहिती

गुजरातमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरात 56 पैशांनी कपात करण्यात आली आहे. तसेच हरियाणात पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये पेट्रोल 55 पैशांनी तर डिझेल 50 पैशांनी महागलं आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्येही पेट्रोलच्या दरात 44 पैशांनी वाढ झाली आहे. येथे डिझेलही 41 पैशांनी वाढले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price
Bhayander News: कौटुंबिक बाधा दूर करण्याचा बहाणा, मांत्रिकाकडून ३५ वर्षीय विवाहितेवर अत्याचार; संतापजनक घटना

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com