Kangana Ranaut On Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Kangana Ranaut On Rahul Gandhi: राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस, कंगना रनौत संतापल्या

Hindenburg Report: भाजप खासदार कंगना रनौत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी सर्वात धोकादायक माणूस, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

Priya More

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेस खासदार तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कंगना रनौत यांनी 'राहुल गांधी हे सर्वात धोकादायक व्यक्ती आहेत. ते विषारी आणि विध्वंसक आहेत.', अशी टीका केली. राहुल गांधी यांनी हिंडनबर्ग अहवालानंतर केंद्र सरकारला कोंडीत पकडले. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले. त्यांनी अदानी ग्रुप आणि सेबी यांच्यातील संगनमताचा आरोपही केला. याच मुद्द्यावरून कंगना रनौत या राहुल गांधी यांच्यावर संतापल्या.

भाजप खासदार कंगना रनौत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राहुल गांधी हा सर्वात धोकादायक माणूस आहे. ते विषारी आणि विध्वंसक आहेत. त्यांचा अजेंडा आहे की जर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत तर ते या देशालाही नष्ट करू शकतात. आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य करणाऱ्या हिंडनबर्गच्या अहवालाचे काल रात्री राहुल गांधी समर्थन करत होते. तो अहवाल खोटा ठरला.'

कंगना रनौत यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी तुम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात बसायला तयार राहा आणि तुम्ही ज्याप्रकारे दु:ख सोसत आहात त्याप्रमाणे या देशाच्या जनतेचा अभिमान, विकास आणि राष्ट्रवादाला पाहून तुम्हाला वाईट वाटेल. या देशाची जनता तुम्हाला कधीही नेता बनवणार नाही.'

अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर देखील आरोप केले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर भाजप खासदार कंगना रनौत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली. सेबीच्या अध्यक्षांवरील आरोपांनी संस्थेच्या अखंडतेशी गंभीरपणे तडजोड केली आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची पुन्हा स्वतःहून दखल घेणार का? राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की 'पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीच्या तपासाला इतके का घाबरतात? हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT