Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Mumbai Andheri News : मुंबईच्या अंधेरीत ५ कोटींचे प्रायव्हेट लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिल्म निर्मात्याची १० लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. अंबोली पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल.
MUMBAI FILM PRODUCER LOAN FRAUD ₹10 LAKH SCAM IN ANDHERI
MUMBAI FILM PRODUCER LOAN FRAUD ₹10 LAKH SCAM IN ANDHERIAI Image
Published On
Summary
  • मुंबईच्या अंधेरीत फिल्म निर्मात्याची १० लाख ३ हजार रुपयांची फसवणूक

  • फिल्म प्रोजेक्टसाठी ५ कोटी रुपयांचे प्रायव्हेट लोन मिळवून देण्याचे आरोपींकडून आमिष

  • अंबोली पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे

संजय गडदे, मुंबई

मुंबईच्या अंधेरीमध्ये एका प्रसिद्ध फिल्म निर्मात्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिल्म प्रोजेक्टसाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे प्रायव्हेट लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत १० लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी कौशिक लाठिया आणि लॅविन कन्हैयालाल परयानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अंधेरी पश्चिम येथे राहणारे फिल्म निर्माते हेमंतकुमार विठ्ठलराव महाले यांनी फिल्म प्रोजेक्टसाठी आर्थिक मदतीच्या शोधात असताना इंस्टाग्रामवर एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीमध्ये फिल्म निर्मिती, प्रोजेक्ट फायनान्स तसेच बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी तब्बल १० कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर महाले आरोपींच्या संपर्कात आले. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपींनी ऑनलाइन Zoom मीटिंग करून महाले यांच्याशी संवाद साधला. या बैठकीदरम्यान त्यांनी कर्ज देण्याबाबत विविध माहिती देत महाले यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ५ कोटी रुपयांचे लोन मंजूर करण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे आरोपींकडून सांगण्यात आले.

MUMBAI FILM PRODUCER LOAN FRAUD ₹10 LAKH SCAM IN ANDHERI
Vastu Tips : तुटलेल्या भांड्यांमध्ये जेवण करणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगत

यामध्ये ई-रजिस्ट्रेशन शुल्क, स्टॅम्प ड्युटी तसेच ३ हजार रुपये वकिलांची फी अशा स्वरूपात रक्कम मागण्यात आली. आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात महाले यांनी एकूण १० लाख ३ हजार रुपये ट्रान्सफर केले. रक्कम भरल्यानंतर अवघ्या तीन तासांत ५ कोटी रुपयांची कर्जरक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, ठरलेल्या वेळेनंतरही त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. त्यानंतर महाले यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी अखेर अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

MUMBAI FILM PRODUCER LOAN FRAUD ₹10 LAKH SCAM IN ANDHERI
Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना! CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा मृत्यू; बाथरूममध्ये गेला अन्...

या तक्रारीच्या आधारे अंबोली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. या फसवणुकीमागे आणखी कोणाचे नेटवर्क आहे का, तसेच पैसे ज्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले त्यांचा वापर इतर फसवणुकीच्या प्रकरणांत झाला आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com