अभिजीत दिपकेंचा लाडकी बहीण योजनेवर घणाघात.
लाडक्या बहीण योजनेचे तुम्ही पंधराशे रुपये देतात आणि तिच्या लेकराचे 2200 मारतात....
सातशे रुपये चा स्वतःचा फायदा सरकार करून घेत आहे.
सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाची करणार कृषीमंत्री पाहणी
दुपारी ३ वाजता विभागीय कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळाचा घेणार आढावा
दुष्काळ परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर कृषिमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष
यंदाच्या वर्षीचे गणेशोत्सवाचे अखेरचे २ दिवस
२ दिवस राहिल्यामुळे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला मोठी गर्दी
संध्याकाळी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
शेवटचे २ दिवस राहिल्यामुळे पुणे शहरात सुद्धा मोठी गर्दी
मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकच्या निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे ट्रक आणि छोटा हत्ती यांच्यात अपघात झाला या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार गोकुळ गीते यांनी घटनास्थळी थांबून मदतकार्य केले दोघांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करत अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळवून दिली. त्यांच्या तत्परतेमुळे अपघातस्थळी मदतकार्याला वेग आला.
पाऊस गायब झाला पिकांना कणसे नाही , सोयाबीन शेंगा नाही, परिस्थिती बिकट आहे. दुष्काळ आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे...सर्कल व्हाइज पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे. सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवरून अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.परिस्थिती आणखी वाईट होण्याची वाट न बघता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.येत्या एक-दोन महिन्यात राज्यातील परिस्थिती अधिक भीषण होईल, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नये,आदिवासी आश्रमशाळांचा दाखला देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
मुख्य सचिव राजेश अग्रवालांसह अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व विविध विभागांच्या सचिवांची उपस्थिती
राज्यात अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. “राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा उभे करणे हे आमचे ध्येय आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुरंदर तालुक्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले. राज्यातील इतर भागांतही पावसाच्या खंडामुळे पिकांवर परिणाम झाल्याचे कृषिमंत्र्यांच्या अलीकडील आढावा बैठकीत नमूद करण्यात आले आहे.
महायुतीतील वाद चव्हाट्यावर...
भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला दाखवले काळे झेंडे...
कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांना दाखवले काळे झेंडे...
रांजणगाव देशमुख-अंजनापूर सौर प्रकल्पाच्या लोकार्पणावरून राजकारण तापले...
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेतून डावलल्याने कार्यकर्ते आक्रमक...
आमदार आशुतोष काळे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी...
पालकमंत्री विखे पाटलांनी फिरवली कार्यक्रमाकडे पाठ...
विखे पाटलांबद्दलही कोल्हे समर्थकांनी व्यक्त केली नाराजी...
मुख्यमंत्र्यांचा तीन जिल्ह्यात दुष्काळ दौरा
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - फडणवीस
एकनाथ शिंदेंची बाळापुरात दुष्काळाची पाहाणी
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ६० किलो गांजा जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून स्कॉर्पिओ वाहनातून हा गांजा हस्तगत करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दुष्काळामुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या एका शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधून त्याला तो विचार सोडण्याचे आवाहन केले. शिंदे यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार सोडल्याचे सांगण्यात आले.
बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात कार्यरत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांच्याविरोधात विवाहित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या संमतीविना अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे वडवणी तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
IIT पवईच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे IIT पवई परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी ठाकरे सेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून, शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. 5 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर न केल्यास समृद्धी महामार्ग बंद पाडण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला. यावेळी देशमुख यांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अन्य महत्त्वाच्या प्रकरणांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने सुनावणीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
धुळे जिल्ह्यात शेतकरी संकटाचा सामना करत असताना भाजप नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेलिब्रिटी कार्यक्रमांवरून विरोधकांनी टीका केली आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंत्री जयकुमार रावल यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्तही सेलिब्रिटी डान्स कार्यक्रम झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकोला दौऱ्यावर आमदार नितीन देशमुख यांनी टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकण्याऐवजी केवळ हायवेलगतच्या शेतांची पाहणी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला. “शेतात जायला पाहिजे, गावात मुक्काम करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा ऐकल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले.
वाशीम दौऱ्यावर असलेले शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दुष्काळजन्य पीक परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला. “शेतात काहीच उरलेलं नसताना जीआर-एफआर काढण्यापेक्षा प्रति हेक्टरी किती मदत जाहीर करता?”, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले. दानवे यांनी वाशीममधील पीक परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
यवतमाळात ठाकरे सेनेच्या आक्रोश मोर्चात उसळला जनसागर
शक्तिपीठचं काम विदर्भात थांबवणार,आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा
हेक्टरी 50 हजार रूपयांची शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा,अन्यथा येणाऱ्या 5 तारखेला विदर्भातून जाणारा शक्तीपीठाचं काम थांबविण्यात येईल.
बीड शहरातील जुना धानोरा रोड बागात असलेल्या शिराळे नगर येथील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
बीड जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस झालेला आहे
यामुळे नगरपालिकेकडून पाण्याचे नियोजन केले जात असताना अशा पद्धतीने लिकेज व पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात दुष्काळाने शेतकरी बेहाल, मंत्रालयात कोट्यावधींची उधळपट्टी
मंत्रालयातील उपहारगृहाच्या किचन लेआऊटसाठी पावणेतीन कोटींची खैरात
मंत्रालयातील उपहारगृहातील किचनसाठी १ कोटी ७६ लाख तर नव्या प्रशासकीय इमारतीच्या कॅन्टीन साठी १ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी
मागील दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस नाही आणि पाऊस खरिपाची संपूर्ण पिके करपून गेली आहेत.
त्यामुळे नांदेड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरकारने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसने घंटानाद आंदोलन केले.
गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे
१० हजार अधिकारी कर्मचारी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यावर असतील
लक्ष्मी रस्ता२६७,टिळक रस्ता २३१ कुमठेकर रस्ता ५०,केळकर रस्ता ६९ या चार रस्त्यावर ६३८ मंडळ विसर्जन करण्यासाठी जातील
२६ ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळ पडला आहे
शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन जमीन कोरडी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली आणि शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली
यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "२ दिवसात राज्य सरकार दुष्काळग्रस्तांसाठी GR काढणार असल्याचं म्हटलं
जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची २३ सप्टेंबर २०२६ रोजीची स्थिती चिंताजनक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण ५६ प्रकल्पांमध्ये सध्या ६३८.९९ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ६३.०२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ९००.२७ दशलक्ष घनमीटर म्हणजे ८५.२७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २६१.२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा कमी आहे.
निफाड तालुक्यातील कोकणगावजवळ झालेला भीषण अपघात पाहताच मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर असताना रस्त्यावर अपघात झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः ट्रकवर चढून अपघातात जखमी झालेल्या ट्रकचालकाला बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यांच्या या कार्यतत्परतेची घटनास्थळी उपस्थितांकडून चर्चा होत आहे.
ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील तब्बल ६ हजार रहिवाशांना हक्काचे पक्के घर मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनासोबतच रस्ते, नागरी सुविधा आणि नियोजनबद्ध बांधकामाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सिद्धेश्वर तलाव परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व महत्त्वाचे रस्ते बंद
डायव्हर्शन पॉईंट, रिंगरोड, नो-पार्कीगची ठिकाणे व पार्किंग ठिकाणे जाणून घेण्याबद्दल पुणे पोलिसांचे आवाहन
गणेश विसर्जनाची मिरवणुकीला सकाळी ०९ वाजण्याच्या सुमारास होणार सुरुवात
लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, गणेश रोड, केळकर रोड यासह सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद
25 सप्टेंबर सकाळी नऊ पासून गणेश विसर्जन मिरवणुकी पर्यंत रस्ते राहणार वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी बारामती एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाची पाहणी केली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये विद्या प्रतिष्ठानची बैठक सुरू आहे. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असून मोरगाव आणि मूर्ती या गावांना भेट देणार आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी भवन, कसबा येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे आज बारामतीत पवार कुटुंबीयांच्या विविध कार्यक्रमांमुळे राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेती पिके करपली आहेत. पावसाअभावी हतबल झालेल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील शेतकरी वैजनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी जयश्री सूर्यवंशी यांनी अडीच एकरवरील करपलेले सोयाबीन पीक पेटवून दिले. पीक पेटवताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
पाऊस नसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून दुष्काळामुळे जगणं अवघड झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी आणि नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) संदर्भातील वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात प्रकाश आंबेडकर आज सकाळी ११ वाजता न्यायालयात स्वतः वकील म्हणून बाजू मांडणार आहेत. PESच्या अध्यक्षपदावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले असून, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नुकतीच संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रकाश आंबेडकर न्यायालयासमोर नेमकी काय भूमिका मांडणार आणि न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठवाडा आणि सोलापुरातील दुष्काळाचा आढावा घेणार असून निलंग्यापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात पाहणी केली जाणार आहे. दुष्काळाची दाहकता मोठी असून सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे नवनाथ बन यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील आणि निलंग्यात शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळाली.
संचालकांच्या २५ जागांसाठी तब्बल ३०१ इच्छुकांनी ४३६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ८२ इच्छुकांनी ११५ अर्ज दाखल केले.
आता आजपासून या अर्जांची छाननी सुरू होणार असून, कोणाचे अर्ज टिकणार आणि कोणाच्या उमेदवारीला आक्षेप घेतला जाणार, याकडे लक्ष लागलं आहे.
धाराशिव -
एनडीआरएफचे निकष गृहीत न धरता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेल
दसरा दिवाळी सणापूर्वीच शेतकऱ्यांना सरकार मदत करण्याचा करत आहे विचार
भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती
मुंबई -
मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरेंनी बोलवली बैठक
सकाळी 11 वाजता शिवतेर्थ येथे बैठकीचा आयोजन
SIR बाबत घेणार आढावा तसेच पक्षाच्या अंतर्गत स्थितिबाबत घेणार आढावा
धार्मिक मुद्द्यांना घेऊन होणाऱ्या राजकारणाबद्दलही राज ठाकरे नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती
मुंबई -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर
आज मराठवाड्यातील दुष्काळी दौरा झाल्यानंतर उद्या पश्चिम विदर्भात
वाशिममधील शेतकऱ्यांच्या बांधावर उद्या मुख्यमंत्री नुकसानाची पाहाणी करणार
पुणे -
हडपसर -दिवेघाट रस्ता आज २ तासांसाठी बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आज ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.
या कामामुळे दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
तरी या कालावधीत नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आलं आहे
सोलापूर -
मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणार
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाची भीषण परिस्थिती समोर आणली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी गावात शेतकऱ्यांनी जळून गेलेले भुईमूग आणि तुरीचे पीक हातात दाखवत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
मुंबई - आठवड्याभरात मुंबई विमानतळावर दुसऱ्यांदा पकडलं बनावट पासपोर्ट
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणी नागरिकाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त
- या आधी 13 सप्टेंबर रोजी पकडलं होतं नेपाळी नागरिकाचं बनावटी भारतीय पासपोर्ट
- आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अफगाणी नागरिकाला इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून पकडल्याची घटना
- दुबईला जाणाऱ्या विमानाच्या इमिग्रेशन तपासणीदरम्यान प्रकार उघडकीस
- 21 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8.50 वाजता प्रवासी इमिग्रेशन काऊंटरवर आला
- प्रवाशाने अमजद अख्तर खान या नावाने भारतीय पासपोर्ट क्रमांक S-6558153 सादर केला
- मुंबईहून दुबईला जाणाऱ्या EK509 विमानाचे बोर्डिंग पासही प्रवाशाकडे होते
नागपूर -
- नागपुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या स्कूल बसेसवर आरटीओचा कारवाई बडगा
- शहरातील १,७२९ स्कूल बसेसची आरटीओकडून तपासणी करत तब्बल २७७ स्कूल बसेस दोषी आढळल्या
- दोषी स्कूल बसेसवर दंडात्मक कारवाईसह ई-चलन जारी करण्यात आले..
- वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४४ बसेसची नोंदणी कायमची रद्द, गंभीर दोष आढळल्याने १० स्कूल बसेस तात्काळ जप्त
- फिटनेस नसलेल्या वाहनांवर आरटीओचे 'झिरो टॉलरन्स' धोरण, परवाना, फिटनेस, विमा, वाहन कर आणि पीयूसीची तपासणी
सोलापूर-
दक्षिण सोलापुरात ुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे
दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
नांदणी गावातील पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला पाझर तलाव कोरडा पडल्याने गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदणीसह परिसरातील पाच ते सहा गावांसाठी हा पाझर तलाव महत्त्वाचा जलसाठा मानला जातो.
गेल्यावर्षी याच काळात पाण्याने भरून वाहणारा हा तलाव यंदा सप्टेंबर महिन्यातही कोरडाच असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांसह पशुधनासाठीही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
पुणे -
अजितसृष्टी’ देखावा पाहून जय पवार भावुक
पुण्यातील गणेशोत्सवातील ‘अजितसृष्टी’ देखावा पाहून जय पवार भावुक
दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने जय पवार यांच्या डोळ्यांत अश्रू
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते युवराज बेलदरे यांच्याकडून ‘अजितसृष्टी’ देखावा साकार
पुणे -
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार
पुणे जिल्ह्यातील दौंड,बारामती पुरंदर तालुक्यातील गावांना देणार भेटी
राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची अवस्था वाईट आहे.
त्यामुळे कृषिमंत्री थेट आता बांधावर जाऊन पीक परिस्थितीचा घेणार आढावा.
राज्यात दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी विरोधक आक्रमक आहेत.या पार्श्वभूमीवर आता मंत्री थेट बांधावर जाऊन ती परिस्थितीची पाहणी करणार आहेत..
पुणे -
गणपती विसर्जन मिरवणुकीचा मान यंदाही महापालिका आयुक्तांनाच
वैभवशाली गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्याचा मान यंदाही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनाच मिळणार आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने शहरात आचारसंहिता लागू झाली आहे.
त्यामुळे.महापौरांसह सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नसल्याने आयुक्तांच्या हस्तेच मानाच्या गणपतींची आरती करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
नांदेड -
शेतातील विद्युत पोल वरील तारांचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किटमुळे दोन एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे.
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकरी विठ्ठल इंगोले ऊस जळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. इंगोले यांनी दोन एकर वर उसाची लागवड केली होती.
तोडणीला आलेल्या उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकर वरील ऊस तळून खास झाला असून शेतकऱ्याचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झल्याचा अंदाज आहे.
सोलापूर -
सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सलग मुसळधार पाऊस.
शहरात गेल्या एक तासापासून विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस..
जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची दमदार हजेरी..
शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे बत्तीगुल
पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी
नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल, वाहनचालकांचे हाल
पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
अवघ्या काही तासांतच पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते, सखल भाग आणि चौक जलमय झाले असून अनेक ठिकाणी नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.