Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Surabhi Jayashree Jagdish

जास्त ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं

जास्त ट्रॅफिकमध्ये गाडी वारंवार थांबवावी आणि पुन्हा सुरू करावी लागते. अशा वेळी गाडी सतत थांबणं आणि चालणे यामुळे पेट्रोलचा वापर वाढतो. सिग्नल आणि गर्दीच्या रस्त्यांवर ही गोष्ट जास्त जाणवते.

Improve car mileage | saam tv

सतत वेगाने गाडी चालवणं

गाडी खूप जास्त वेगाने चालवल्यावर इंजिनला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे कमी किंवा मध्यम वेगाच्या तुलनेत पेट्रोलचा वापर वाढू शकतो. रस्त्याची परिस्थिती आणि वेगमर्यादा लक्षात घेऊन स्थिर वेगाने गाडी चालवणं अधिक योग्य ठरतं.

Car mileage tips | saam tv

गाडी बराच वेळ सुरू ठेवणं

गाडी चालवत नसतानाही इंजिन सुरू ठेवलं तर पेट्रोल खर्च होत राहतं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी बराच वेळ थांबायचं असल्यास गरज नसताना इंजिन सुरू ठेवू नये. यामुळे विनाकारण होणारा पेट्रोलचा खर्च कमी करता येतो.

Petrol consumption | saam tv

टायरमध्ये हवा कमी असणं

टायरमध्ये योग्य प्रमाणापेक्षा कमी हवा असल्यास रस्त्याशी टायरचा घर्षण वाढतो. त्यामुळे गाडी पुढे नेण्यासाठी इंजिनला जास्त मेहनत करावी लागते आणि पेट्रोलचा वापर वाढू शकतो. म्हणून गाडीच्या कंपनीने सांगितलेल्या प्रमाणात टायरमध्ये हवा ठेवणं महत्त्वाचं आहे.

Driving habits | saam tv

गाडीत गरजेपेक्षा जास्त सामान ठेवणं

गाडीत विनाकारण जास्त सामान ठेवल्याने गाडीचे वजन वाढतं. जड गाडी हलवण्यासाठी इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे पेट्रोलचा वापर वाढू शकतो. त्यामुळे रोजच्या वापरात गरज नसलेलं जड सामान गाडीत ठेवणं टाळावं.

Car maintenance tips | saam tv

एसीचा जास्त वापर

एसीचा सतत आणि जास्त वापर केल्यास गाडीच्या इंजिनवर अतिरिक्त भार पडू शकतो आणि मायलेजवर परिणाम होऊ शकतो. तसंच वेळेवर सर्व्हिसिंग न केल्यास गाडी आणि इंधनाचा वापर दोन्हीवर परिणाम होऊ शकतो.

High speed fuel consumption | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Morning drink | saam tv
येथे क्लिक करा