BJP MP Harsh Mahajan being assisted after feeling dizzy during a protest in Shimla before being rushed to IGMC hospital. saam tv
देश विदेश

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

Rajya Sabha MP Harsh Mahajan Suffers Dizziness: हिमाचल प्रदेशचे भाजप खासदार हर्ष महाजन यांना शिमल्यातील धरना आंदोलनादरम्यान अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने IGMC रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Omkar Sonawane

हिमाचल प्रदेशचे भाजप नेते तथा राज्यसभा खासदार हर्ष महाजन यांची शनिवारी अचानक तब्येत बिघडली. ते शिमल्यातील सीटीओजवळ भाजपच्या धरना प्रदर्शनात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत राज्य सरकारविरोधात पक्षाची भूमिका मांडली. यानंतर ते खाली उतरून माध्यमांशी बोलत असताना त्यांना अचानक चक्कर आली. महाजन यांची प्रकृती बिघडताच तेथील भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांना सावरले. त्यांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून शनिवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हर्ष महाजन यांनी सांगितले की आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सतत धावपळ आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांचा रक्तदाब (बीपी) अचानक कमी झाला होता. त्यामुळे शरीराचा समतोल बिघडून त्यांना ही समस्या उद्भवली. IGMC येथील डॉक्टरांनी उत्तम उपचार केल्यामुळे ते आता पूर्णपणे स्वस्थ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी रुग्णालयातून हलका आहार घेतानाचा एक व्हिडिओही शेअर करून समर्थकांचे आभार मानले.

रुग्णालयातील लिफ्ट बंद

रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे हर्ष महाजन यांना स्ट्रेचरसह उचलून दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ सीसीयू वॉर्डपर्यंत पोहोचवले.

भाजप नेते रुग्णालयात दाखल

हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल आणि माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन हर्ष महाजन यांची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर धरना स्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT