Sakshi Sunil Jadhav
डाळिंब हे फळ तुम्ही घरात बऱ्याचदा आणत असाल. याच्या सेवनाने तुम्हाला भविष्यात ७ गंभीर आजारांपासून लांब राहता येतं. प्रत्येकानी याचे फायदे जाणून घेतले पाहिजेत.
डाळिंबाच्या रसाने रक्तवाहिन्यांमधले खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहून हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
डाळिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे ह्रदयावरता ताण सुद्धा कमी होतो.
संशोधनानुसार डाळिंबातले प्युनिकालागिन्स हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवण्याचं काम करतात. यामध्ये प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध याचा फायदा होऊ शकतो.
डाळिंबातल्या पॉलिफेनॉल्स मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतात. त्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि वाढत्या वयातल्या विस्मरणाचा धोका कमी व्हायला मदत होते.
डाळिंबातल्या व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
डाळिंबातले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातले जंतू कमी करायला मदत करतात. त्यामुळे हिरड्यांच्या समस्या आणि तोंडाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.