Operation Sindoor Saam
देश विदेश

BJP: 'घर सोडून पळा, कलमा म्हणत राहा', पाकिस्तानवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं; BJP मंत्र्यांकडून VIDEO व्हायरल

Indias Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. एअर स्ट्राईकचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. एअर स्ट्राईक करून ९ दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. मंगळवारी रात्री १:२८ मिनिटांनी नऊ दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये दहशकवाद्यांचे तळ कशा पद्धतीने उद्धवस्त झाले, हे दिसून येत आहे. अशातच हल्ल्यावेळी पाकिस्तानची नेमकी परिस्थिती कशी होती, याचा एक व्हिडिओ भाजप मंत्री कपिल मिश्रा यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये काहीही ठळक दिसून येत नाही. मात्र, यात एक आवाज ऐकू येत आहे. यात हा व्यक्ती लोकांना सूचना देताना दिसून येत आहे.

भाजप मंत्री कपिल मिश्रा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये काही दृश्ये दिसत नाहीत, मात्र, लोकांना घरे सोडून पळण्यास आणि सतत कलमा पठण करत राहण्यास सांगणारा आवाज ऐकू येत आहे.

व्हिडिओ शेअर करत कपिल मिश्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'पाकिस्तानमधील एका मदरशातून घोषणा झाली. घर सोडून पळा, कलमा म्हणत राहा. जिहादींनी निष्पाप लोकांना कलमा म्हणायला लावलं आणि ज्यांना म्हणता आलं नाही, त्यांना ठार मारलं'.

पाकिस्तानमधील नागरिकांचा गोंधळ

पाकिस्तानमधून समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्रांचे स्फोट, आकाशात उडणारे आगीचे लोळ, आणि लोकांचा गोंधळ दिसत आहे. लोक भीतीने ओरडताना, घाबरून पळताना दिसत आहे. काही व्हिडिओंमध्ये लोकांनी हल्ल्यांची कबुली दिली असून, आपल्या सैन्यावरही संताप व्यक्त करताना दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT