Shivraj Singh Chouhan Canva
देश विदेश

Shivraj Singh Chouhan: भाजपच्या बहुमताचा आकडा ४००पेक्षा जास्त असेल: माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Shivraj Singh Chouhan: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते देवांची पूजा-अर्चा करताना दिसत आहेत. आज त्यांनी शिर्डीतील साई बाबांचे आणि शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाविषयी मोठा दावा केलाय.

Bharat Jadhav

(सुशील थोरात)

Shivraj Singh Chouhan At Shanishinganapur:

मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने यश मिळवले. त्याचप्रमाणे देशाला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे. त्यामुळे देशात भारतीय जनता पार्टी पुन्हा बहुमताने सत्तेत येईल. यावेळी बहुमताचा आकडा हा ४०० पेक्षा जास्त असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. ते शनिशिंगणापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. देशातील सर्वच भारतीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, अशी मी शनिदेवाला प्रार्थना केल्याचं ते म्हणाले. (Latest News)

मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी सपत्नीक शनिशिंगणापूर येथील शनी देवाची पूजा केली. दरवर्षी नववर्षाला शिवराजसिंह चव्हाण हे न चुकता शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शनाला येत असतात. येथे त्यांनी तेल अभिषेक करत शनिदेवाची महापूजा केली.

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले, राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात होत असून देशभरामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आम्ही भाग्यशाली आहोत की आमच्या समोरच प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे, असं ते पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साई बाबांचे घेतले दर्शन

शिवराजसिंह चौहान यांनी शिर्डी येथील साई मंदिरात जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी मध्य प्रदेशातील सरकार चांगलं काम करावं. राज्याला प्रगतीपथावर न्यावे असी प्रार्थना आपणी साईबाबांकडे केल्याचं शिवराजसिंह चौहान म्हणाले होते. मध्य प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता कायम राखली. परंतु या विजयाचे शिल्पकार म्हटले जाणारे शिवराजसिंह चौहान यांना मात्र सीएमची खुर्ची मिळाली नाही.

क्षाचा निर्णय म्हणून त्यांनी त्या निर्णयावर जास्त बोलणं जरी टाळलं असलं तरी त्यांनी आपल्या काही कृतीतून नाराजी व्यक्त केली होती. याविषयी बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले, राज्यातील नव्या सरकारने राज्याला प्रगतीपथावर न्यावे. आपण एक कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांना नेहमीच सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले. भाजपामुळेच १७ वर्षे मी मुख्यमंत्री राहिलोय. भाजपा एक मिशन असून या मिशनचे आम्ही कार्यकर्ते आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी आगामी काळात पूर्ण करू असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT