CCTV grab shows the moment a speeding car ran over BJP leader Vikas Goyal in Haridwar. saam tv
देश विदेश

भीषण अपघात! भाजपच्या दिग्गज नेत्याला कारने चिरडले; राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Vikas Goyal Accident In Haridwar CCTV Video: हरिद्वारमध्ये भाजप नेते विकास गोयल यांचा भरधाव कारखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी चालक फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

हरिद्वारमध्ये घरात कुंड्यांना पाणी घालत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या कारखाली चिरडून भाजपचे नेते विकास गोयल यांचा मृत्यू झाला. आरोपीने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर त्यांच्या किंकाळ्या ऐकून त्यांची पत्नी बाहेर आली. विकास गोयल यांना उपचारासाठी भूमानंद रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डेहराडून येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र बुधवारी त्यांचे त्या ठिकाणी निधन झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शिवलिक नगर परिसरात झाला. ही गाडी हरिद्वारची असून आरोपी लवकरच पकडला जाईल असे पोलिसांनी सांगितले. घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, विकास गोयल झाडांना पाणी घालत असताना अचानक एक कार थेट त्यांच्या अंगावर चढली. प्रत्यक्षदर्शी आणि फुटेजनुसार, कार इतक्या जास्त वेगाने जात होती की चालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक लावण्याऐवजी त्याने गाडी थेट बागेत घातली. अपघात झाल्यानंतर लगेचच, ड्रायव्हर आपली गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला.

राणीपूर कोतवालीचे प्रभारी मनोहर सिंग भंडारी यांनी सांगितले की, अपघातात सामील असलेल्या गाडीचा नोंदणी क्रमांक हरिद्वारचा आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे ड्रायव्हरची ओळख पटवली जात असून, त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत. राणीपूरचे आमदार आदेश चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विकास गोयल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT