Uttar Pradesh News  Saam TV
देश विदेश

BJP Leader Killed : भाजप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

BJP Leader Pramod Yadav News : भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे. पोलिसां घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

प्रविण वाकचौरे

BJP Leader Pramod Yadav :

भाजप नेत्यांचा गोळा घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद यादव (55 वर्ष) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रमोद यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी त्यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकी सोडून पळ काढला.

गंभीर जखमी झालेल्या प्रमोद यादव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींची दुचाकी ताब्यात घेतली असून अधिक तपास करत आहेत.

प्रमोद यादव यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आरोपींचा शोध आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचा शोध घेत आहेत.

प्रमोद यादव हे भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते. याआधीही त्यांनी भाजपच्या तिकिटावर मल्हाणीतून दोनदा विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. प्रमोद यादव यांनी 2012 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जौनपूरच्या मल्हानी मतदारसंघातून लढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

Maharashtra Live News Update: नांदेडच्या हदगाव नगरपरिषद निवडणूकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Baba Vanga Gold Prediction : पुढच्या वर्षी सोनं स्वस्त होणार की महागणार? बाबा वेंगा यांची मोठी भविष्यवाणी

Pickle Storage Tips: हिवाळ्यात लोणचे खराब होऊ नये म्हणून कसे साठवावे? ही सोपी पद्धत नक्की फॉलो करा

Maharashtra Politics: शेवटच्या क्षणी अजितदादांनी उघडला पत्ता; बारामतीत नगराध्यक्षपदासाठी उतरवला तगडा उमेदवार|VIDEO

SCROLL FOR NEXT