Kerala BJP State Secretary and Kodunganoor ward councillor VV Rajesh has been elected as the Mayor of Thiruvananthapuram Corporation  saam tv
देश विदेश

भाजपनं केरळमध्ये रचला इतिहास, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान; विधानसभा निवडणुकीआधीच मोठे संकेत

BJP creates history in Kerala Mayor Election : केरळच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप एखाद्या महापालिकेत सत्तेत आला आहे. तसेच पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान झाला आहे.

Nandkumar Joshi

दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळमध्ये (Kerala) भाजपनं इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच केरळमधील एखाद्या महापालिकेत भाजपची सत्ता आली असून, पक्षाचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. व्ही. राजेश (V V Rajesh) यांची केरळची राजधानी तिरुवनंतपुरम महापालिकेच्या महापौरपदी निवड झाली आहे. दक्षिणेकडील राज्याच्या राजकारणातील ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

केरळच्या राजकीय इतिहासात भाजप अद्याप कधीच एखाद्या महापालिकेवर सत्तेत बसला नव्हता. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर व्ही. व्ही. राजेश यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच्या सर्व १०१ वॉर्डांमध्ये विकासाची कामं केली जातील. तिरुवनंतपुरम विकसित शहर म्हणून ओळखला जाईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी महापौर निवड झाली. यात ४५ वर्षीय राजेश यांना एकूण ५१ मते मिळाली. त्यांना अपक्ष नगरसेवक एम राधाकृष्णन यांनीही पाठिंबा दर्शवला. तर एका अपक्ष नगरसेवकानं मत दिलं नाही. १०० सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात राजेश यांच्या बाजूने ५१ मते पडली. त्यांच्याविरोधात सीपीआयएमच्या आरपी शिवाजी यांना २९, तर काँग्रेसच्या नेतृत्वात यूडीएफच्या केएस सबरिनाथन यांना एकूण १९ मते मिळाली. भाजपने डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या तिरुवनंतपुरम पालिकेच्या निवडणुकीत ५० जागा जिंकल्या होत्या.

विशेष म्हणजे मागील ४५ वर्षे तिरुवनंतपुरम पालिकेवर माकपची सत्ता होती. भाजपनं यावेळी झालेल्या निवडणुकीत सुरूंग लावला आणि दक्षिणेकडच्या राज्यात भाजपची पकड निर्माण होत असल्याचे दाखवून दिले. शपथविधी सोहळ्यानंतर केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की, माकप आणि काँग्रेसने शहराला मागे ढकललं होतं. पालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला होता. गेल्या काही वर्षांत सांडपाणी, पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष दिले गेलेले नाही.

आजपासून आमचं काम सुरू होणार आहे. तिरुवनंतपुरम शहराला देशातील आघाडीच्या तीन शहरांमध्ये स्थान मिळवून देणं हे आमचं लक्ष्य आहे. राज्यात आगामी काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये या माध्यमातून एक नवं पर्व सुरू झालं आहे, असं भाजपचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात काँग्रेसला नवा चेहरा मिळाला, ऐन निवडणुकीत शरद पवारांना धक्का

Saturday Horoscope: भावनेच्या भरात नुकसान होईल, ४ राशींना मिळेल कर्माचे फळ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: - शिवसेना भाजप यांची जवळपास 210 जागेवर एकमत झाल्याचे माहिती

Ajit Pawar News : अजित पवार गटात नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?

Dog Behavior: ठराविक लोकांना बघुनच कुत्रे का भुंकतात?

SCROLL FOR NEXT