बिहार निवडणुकीत एनडीएची २०० अधिक जागांवर आघाडी
चिराग पासवान किंगमेकर ठरणार
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं महाआघाडीचं सुपडासाफ केलाय. यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार याचा करिष्मा पाहायला मिळाला. अद्याप मतमोजणी चालू असून आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार एनडीएनं २०० जागांवर आघाडी मिळवलीय. तर एनडीएमधील घटक पक्ष जेडीयूनं ८४ जागांवर आघाडी घेतली, त्यानंतर शहरात जागोजागी बिहार मतलब नितीश कुमार असे होर्डिंग्स लावण्यात येत आहेत.
म्हणजेच काय बिहारच्या मुख्यमंत्री पदावर नितीश कुमार विराजमान होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वाचक मित्रांनो, घाई करू नका कारण एनडीएमधील संकटमोचक चिराग पासवान हे किंगमेकर बनण्याची शक्यता आहे.
एनडीएमध्ये जर मुख्यमंत्री पदावरून वाद बिनसला तर भाजप नितीश कुमार यांना सोडून चिराग पासवान यांच्याशी थेट हात मिळवणी करून नव्यानं सत्ता स्थापन करू शकतात,असा अंदाज काही जाणकारांकडून लावला जात आहे. सुरुवातीचे निकाल पाहता मागील निवडणुकीत 'किंगमेकर' ठरलेले नितीश कुमार पुन्हा बिहारचे 'किंग' होणार का, अशी चर्चा सुरू झाली. पण मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर किंगमेकरच्या भूमिकेत चिराग पासवान गेले आहेत.
दरम्यान चिराग पासवान त्यांच्या स्ट्राइक रेटसाठी ओळखले जातात, कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एलजेपी (आर) ने सर्व सहा जागा जिंकल्या आणि १००% स्ट्राइक रेट मिळवला होता. आता विधानसभेतही ते जबरदस्त विजय मिळवण्याच्या तयारीत आहेत. एनडीएमधील घटक सदस्य असलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (राम विलास) २९ पैकी २२ जागांवर आघाडी घेतलीय.
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होतं की, गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट १००% होता. त्यावेळी त्यांनी ६ जागा लढवल्या होत्या, आणि सर्व जागांवर त्यांच्या पक्षांनी विजय मिळवला. या विधानसभा निवडणुकीत लोजपा (आर) ने २९ जागांवर उमेदवार उभे केलेत. तर ते २२ जागांवर आघाडीवर आहेत. जर हे उमेदवार जिंकले तर त्यांच्या पक्षाचा स्ट्राइक रेट ७५% असेन.
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या पक्षाने एनडीएपासून वेगळं होतं निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना मोठा फटका बसला होता. लोक जनशक्ती पक्षाने २०२०च्या विधानसभा निवडणुकीत १३५ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पक्षाला ५.६८ टक्के म्हणजेच २३.८३ लाख मते मिळाली होती. परंतु त्यांना एकच जागा जिंकता आली होती.
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जास्त जागा जिंकूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. दुसरीकडे निवडणूक प्रचारावेळी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, अशी घोषणा भाजप आणि एनडीएच्या इतर पक्षांकडून करण्यात आली. त्यांनी त्याला दुजोराही दिला. मात्र निवडणुकीचा निकाल पाहता भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरलाय. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदाबाबत दावा करू शकते. त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएमध्ये ५ पक्षांचा समवाशे आहे. यात भाजप, जेडीयू यांनी १०१-१०१ जागा लढवल्या आहेत. तर चिराग पासवान यांनी त्यांचे २९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चानं ६-६ जागा लढवल्या आहेत. यात भाजपनं ९५ जागांवर आघाडी घेतलीय.
तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी २१ जागा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा ४ , हिंदुस्तानी आवाम मोर्चानं ५ जागांवर आघाडी घेतलीय. म्हणजेच काय नितीश कुमार यांना सोडून एनडीए १२२ पार गेलं आहे. यामुळे चिराग पासवान हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. याचवरून भाजपचा मुख्यमंत्री होणार का? की नितीश कुमार पुन्हा खुर्चीवर बसणार? हे प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.