Derailment site in Jamui, Bihar, where several freight train wagons collided and fell into a river, disrupting rail services. 
देश विदेश

Train Accident : मालगाडीचा भयंकर अपघात, १२ डब्बे एकमेंकांवर आदळले, ३ डब्बे नदीत कोसळले

Bihar freight train accident latest news : बिहारमधील जमुई जिल्ह्यात मध्यरात्री मालगाडीचा भीषण अपघात झाला. १७ डबे घसरले असून त्यापैकी ३ डबे नदीत कोसळले आहेत. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Bihar Train Accident News Update : मध्यरात्री बिहारमध्ये मालगाडीचा भीषण अपघात झालाय. जमुईमध्ये रात्री १२ वाजता मालगाडी ट्रेनचे १७ डब्बे घसरले. यामधील ३ डब्बे नदीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. १२ डब्बे एकमेकांवर आदळले. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसीडीह-झाझा यादरम्यान टेलवा बाजारजवळ बधुआ नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. मालगाडी जसीडीहवरून झाझाकडे निघाली होती.

३ डब्बे नदीत कोसळले -

बिहारमधील जमुई जिल्ह्यात झालेल्या या अपघातानंतर या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. या अपघातात मालगाडीचे तीन डबे बथुआ नदीत पडले आहेत. जसीडीह येथून वरच्या ट्रॅकवर येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या मालगाडीला अचानक अपघात झाल्याची माहिती रेल्वेमधील सूत्रांनी प्रसारमाध्यमांना दिली. मध्यरात्री १२ वाजता झालेल्या या रेल्वे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या अपघातानंतर रेल्वेकडून या अपघाताची माहिती घेण्यात येत आहे. अपघाताच्या कारणाचा शोध रेल्वेकडून घेण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर मालगाडीचे १२ डब्बे एकमेंकाना जोरात आदळले. त्याशिवाय ३ डब्बे नदीत कोसळले. मालगाडीचे डबे रूळावरच आल्यामुळे रात्री १२ वाजल्यापासून या मार्गावरील रेल्वेंची वाहतूक प्रभावित झाली. अनेक रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

तपासाचे आदेश -

एका जोरदार धक्क्यानंतर पायलटने इंजिन बंद केले. पायलटने रात्री खाली उतरून पाहिले त्यावेळी डब्बे रूळावरून खाली उतरल्याचे दिसले. तर ३ डब्बे नदीत पडल्याचेही लक्षात आले. त्यानंतर पायलटने याबाबतची माहिती तात्काळ रेल्वे स्टेशनला दिली. मालगाडीच्या अपघाताची माहिती मिळताच आरपीएफ-जीआरपी घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने नदीतून डब्बे काढण्याचे काम सुरू आहे. रुळावरून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर रेल्वे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे अनेक गाड्या स्थानकांवरच थांबवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाविकास आघाडीचा जागावाटप तिढा सुटला?

Sanjay Raut : शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा हात, राऊतांच्या दाव्याने देशात खळबळ

Eyelash Care: भुवयांचा रंग फिकट दिवसेंदिवस फिकट दिसतोय? या सोप्या टीप्सने भुवया दिसतील एकदम ठळक

Solapur : भावी नगरसेवकाची निर्घृण हत्या, उशीनं तोंड दाबून उमेदवाराला संपवलं, ५० तोळं सोनं गायब

Upcoming Bollywood Movies : 'किंग' ते 'रामायण'; 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' 8 चित्रपट

SCROLL FOR NEXT