RRB-NTPC निकालाविरोधात बिहारचे विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, सितामढीत पोलिसांवर दगडफेक Saam Tv
देश विदेश

RRB-NTPC निकालाविरोधात बिहारचे विद्यार्थी आक्रमक; रेल्वेचं इंजिन पेटवलं, सितामढीत पोलिसांवर दगडफेक

१४ जानेवारी दिवशी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: १४ जानेवारी दिवशी लागलेल्या आरआऱबी एनटीपीसीच्या निकालानंतर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मागील २ दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे. मंगळवारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी (Students)अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, आणि पोलिसांवर (police) दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या (Bihar) बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक मोठ्या प्रमाणात चक्काजाम केला होता. (Bihar students aggressive against RRB NTPC verdict)

हे देखील पहा-

पाटणामध्ये (Patna) पोलिसांना जमावाला पांगवण्याकरिता अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागले आहेत. तसेच लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागात आरआऱबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावली आहे. विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवर पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावण्यात आली आहे.

यानंतर लोको पायलट रवि कुमारने इंजिनला इतर डब्यांपासून वेगळे केले आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्याकरिता इंजिनमधून उडी मारली आहे. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेचे इंजिन जळून खाक झाले आहे. परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालामधील गैरप्रकाराविरोधामध्ये नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे (Railways) ट्रॅक चक्काजाम केला होता. या आंदोलनामुळे संबंधित ट्रॅकवर वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आले होते. (Bihar students aggressive against RRB NTPC verdict)

मात्र, विद्यार्थी त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेले आहे. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळेस काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थी दगडफेक करत असल्याचे दिसून आले आहे. नवादा स्टेशनवर यानंतर विद्यार्थ्यांनी दुरुस्तीच्या कामांवर असलेल्या गाडीमध्ये आग लावून दिली आहे.

मात्र, अग्निशमन दलाने त्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रेल्वे ट्रॅक चक्काजाम झाल्याच्या बातम्या आल्यावर स्थानिक प्रशासन आणि आरपीएप अधिकारी आणि जवान एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी यांच्यामध्ये थोडा वेळ झटापट झाली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्यात आले आहे. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. नवादा रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी अनेकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Maharashtra Live News Update: खडकवासला धरणामधून 28 हजार पाण्याचा विसर्ग

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

SCROLL FOR NEXT